दिव्यांगांच्या कलाकुसरीचे ‘मंथन’ प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पुणे - आकर्षक फुलदाण्या, डिझायनर कपडे आणि फोटो फ्रेम्स अशा विविधांगी वस्तू पुणेकरांना ‘मंथन’ या प्रदर्शनात मंगळवारी पाहायला मिळाल्या. प्रदर्शनात दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या राख्या आणि भेटवस्तूंना लोकांची पसंती मिळाली. प्रदर्शनात शारीरिक मर्यादेला बाजूला सारत कल्पकतेने आणि मेहनतीने दिव्यांगांनी साकारलेल्या वस्तू पाहता येणार आहेत. 

‘निर्माल्य ट्रस्ट’ने प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डिझायनर कपड्यांसाठी विविध प्रकारचे दागिने खरेदी करण्याकडे महिला-तरुणींनी भर दिला. दागिने, बॅग्ज, कपडे यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू प्रदर्शनात पाहता येतील. सुमारे ५५ स्टॉल्समध्ये दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तू पाहायला मिळतील.  

याबाबत संयोजिका मिनिता पाटील म्हणाल्या, ‘‘दिव्यांग व्यक्तींच्या कलेला वाव मिळावा आणि व्यासपीठ मिळावे, यासाठी हे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या मेहनतीने त्यांनी या वस्तू तयार केल्या आहेत. डिझायनर कपड्यांपासून ते गृह सजावटीच्या वस्तूपर्यंतच्या वस्तू खरेदीही करता येणार आहेत.

Web Title: pune news manthan exhibition

टॅग्स