नानाविध छायाचित्रांच्या बहुरंगी वह्यांना पसंती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे - मुलांना आवडणारे खेळाडू, चित्रपट कलावंत, निसर्गचित्रे, फुले, प्राणी, पक्षी, कार्टून, सामाजिक संदेश देणारी नानाविध छायाचित्रे असलेल्या बहुरंगी वह्यांनी शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे. कागदाचा दर्जा, वहीचा आकार आणि शुभ्रतेमुळे नामांकित कंपन्यांच्या वह्यांना बाजारात मोठी मागणी आहे. वह्या, रजिस्टर खरेदीसाठी बाजारपेठेत विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू झाली आहे. 

यंदा बाजारात आलेल्या वह्यांच्या मुखपृष्ठावर निसर्गचित्रासह शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोणतेही छायाचित्र नको असेल, त्यांच्यासाठी खाकी कव्हर असणाऱ्या वह्या उपलब्ध आहेत. स्थानिक बाजारपेठेत उत्पादित वह्यांची खरेदी केल्यास काही विक्रेते छापील किमतीपेक्षा दहा ते पंधरा टक्के सूट देत आहेत. 

सध्या बाजारात साध्या, प्लॅस्टिक कोटेड, एक व दोन क्‍वायर रजिस्टर, लहान व मोठ्या आकारांच्या वह्या उपलब्ध आहेत. यात प्लॅस्टिक कोटेडच्या वह्यांना पसंती दिली जाते. स्थानिक व विविध कंपन्यांनी वेगवेगळ्या वह्या विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. शंभर व दोनशे पानी वह्यांमध्ये कटसाइज, जंबो साइज असे प्रकार आहेत. शंभर पानी वह्या १०० ते २०० रुपये डझन, तर दोनशे पानी वह्या १५० ते ३०० रुपये डझन या दराने मिळतात. फुलस्केप वह्या १५० ते ३०० रुपये डझनाने मिळत आहेत. ३००-४०० पानी वह्या बाजारात कमी प्रमाणात दिसतात; पण त्यातही ‘कट’ व ‘जंबो’ साइज उपलब्ध आहे. दरम्यान, गणेश मंडळ व काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्वस्त दराने वह्या विकण्यासाठी स्टॉल लावले आहेत.

चिमुकल्यांसाठी कार्टून्स, गोल, त्रिकोण, बहुरंगी आदी आकारांतील हलती रंगीत म्हणजे ‘थ्रीडी इफेक्‍ट’ असलेली चित्रे लावलेल्या वह्या बाजारात उपलब्ध आहेत. एकरेघी, दुरेघी, चौकडा, चित्रकला वह्या उपलब्ध आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा वह्यांच्या किमतीत पाच रुपयांनी वाढ झालेली आहे. 
- सचिन गायकवाड, विक्रेता

Web Title: pune news Many different types of photos notebook are preferred