पुणे : सांगवीत दुमदुमला एक मराठा, लाख मराठाचा एल्गार

मिलिंद संधान
रविवार, 6 ऑगस्ट 2017

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या ठिकाणी निर्भयावर झालेला बलात्कार आणि नंतर तिची झालेली निर्घुण हत्या यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटली. निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, मराठ्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे, अँक्ट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व्हावी यासारख्या मागण्यांकरीता मागिल वर्षी राज्यभरात लाखोंच्या संख्येने ५७ मुक मोर्चे निघाले.

नवी सांगवी : ९ ऑगस्टला मुंबई येथे आयोजित केलेल्या मराठी क्रांती मोर्चाच्या नियोजनासंदर्भातील बैठक येथील संस्कृती मंगल केंद्रात नुकतीच पार पडली. यावेळी सांगवी पिंपळेगुरव परिसरातील मराठा समाज बांधव व सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या ठिकाणी निर्भयावर झालेला बलात्कार आणि नंतर तिची झालेली निर्घुण हत्या यामुळे मराठा समाज बांधवांमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटली. निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, मराठ्यांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे, अँक्ट्रॉसिटी कायद्यात सुधारणा व्हावी यासारख्या मागण्यांकरीता मागिल वर्षी राज्यभरात लाखोंच्या संख्येने ५७ मुक मोर्चे निघाले. शांततेत पार पडलेल्या आणि कुठेही हिंसाचाराचे गालबोल न लागलेल्या या मुकमोर्चांमुळे प्रशासण खडबडून जागे झाले. परंतु मराठ्यांच्या मागण्यांवर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे येत्या बुधवारी मुंबईत राज्यव्यापी मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात सांगवी व पिंपळे गुरव परिसरात आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी आबा पाटील, शांताराम कुंजीर, राजेंद्र कुंजीर यांनी मोर्चाच्या नियोजनासंदर्भात माहिती दिली. आत्तापर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या बैठका, तसेच मराठा क्रांती मोर्चाचे चिंचवड येथील मध्यवर्ती कार्यालय, राष्ट्रीय व राज्य महामार्गावर चहापाणी, नाष्टा व स्वच्छते संबंधी केलेले नियोजन यासंदर्भात माहिती देण्यात आली. मोर्चात तरूणांबरोबर जेष्ठनागरिक, महिला यांच्या सहभागाबद्दल आढावा घेण्यात आला. मुंबईला जवळ असणारे पुणे, पिंपरी चिंचवड व रायगड जिल्हातून समाज बांधवांची संख्या अधिक असल्याचे यावेळी समन्वयकांकडून सांगण्यात आले. 

सर्वपक्षीय नेत्यांमध्ये नगरसेवक नाना काटे, राहुल कलाटे, माजी नगरसेवक संजोग वाघेरे पाटील, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, शिवाजी पाडुळे, शाम जगताप हे उपस्थित होते. 

केवळ सेल्फी काढण्याकरीता मोर्चात हजेरी न लावता आत्तापर्यंत मराठ्यांना कायम दुर्लक्षित करणाऱ्या ढिम्म शासणाला खडबडून जागे करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी समन्वयकांकडून करण्यात आले. हा शेवटचा मुक मोर्चा असून जर शासनाने याची दखल घेतली नाही तर पुढे याचे परिणाम भिषण ठरतील व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासणाची असेल हे प्रामुख्याने यावेळी नमुद करण्यात आले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Pune news Maratha Kranti Morcha meeting in Sangvi