‘मराठी तारकां’नी सियाचीनच्या भूमीवर झेंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

पुणे - छातीत धडकी भरवणारे उंच डोंगर, खोल दऱ्या, दरडी कोसळून कधीही बंद होणारे रस्ते आणि ऑक्‍सिजनच्या कमतरतेमुळे श्‍वासोच्छ्वासावर होणारा परिणाम, अशा प्रतिकूल वातावरणाचा अनुभव ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाच्या टीमने नुकताच सियाचीनमध्ये घेतला. निर्माते- दिग्दर्शक महेश टिळेकर यांची निर्मिती संकल्पना असलेल्या ‘मराठी तारका’ या नृत्य-संगीत कार्यक्रमाच्या टीमने लेह-लडाख आणि सियाचीनला भेट दिली.

सियाचीन येथे बारा हजार फूट उंचीवर भारतीय लष्करातील जवानांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करणारा ‘मराठी तारका’ हा पहिलाच शो ठरला.

लेह येथे ‘मराठी तारका’चा पहिला शो सादर करून त्यानंतर ही टीम सियाचीनच्या दिशेने रवाना झाली. हा प्रवास अतिशय खडतर आणि दमछाक करणारा होता. खारदुंगला पास या १८ हजार ३८० फूट उंचीवरील सर्वांत अवघड खिंडीपर्यंत जाण्याचा रस्ता सर्वाधिक परीक्षा पाहणारा होता. दरडी कोसळल्याने ही टीम चार तास एकाच ठिकाणी अडकून पडली होती, तरीही रात्रीच्या वेळी प्रवास करून त्यांनी मार्ग काढला. सियाचीनला पोचण्याआधी परतापूर येथे भारतीय जवानांच्या तुकडीसाठी त्यांनी कार्यक्रम सादर केला. झिरो पॉइंट या भारत- पाकिस्तान सीमेला भेट दिली. 

झिरो पॉइंटपासून आणखी सहा तासांचा प्रवास करून ही टीम सियाचीनमधील लष्कराच्या बेस कॅंपपर्यंत पोचली. हा प्रवासही कसोटी पाहणारा होता. सियाचीन बेस कॅंपपाशी या टीमने ‘मराठी तारका’ कार्यक्रम सादर केला, तो पाहण्यासाठी दोन हजार जवान उपस्थित होते. त्यात सुमारे अडीचशे मराठी जवानही होते. या टीममध्ये भार्गवी चिरमुले, स्मिता शेवाळे, डॉ. तेजा देवकर, प्राजक्ता माळी, हेमांगी कवी, सारा श्रवण, केतकी पालव, संस्कृती बालगुडे, वैष्णवी पाटील, आदिती घोलप, संकेत साकोरे यांनी नृत्ये सादर केली; तर सावनी रवींद्र आणि अभिजित कोसंबी यांनी गाणी गायली. तसेच, टिळेकर यांनी काही जवानांना स्टेजवर बोलावून नाचण्याचा आणि गाण्याचाही आग्रह केला, त्यालाही जवानांनी प्रतिसाद दिला.

लेहपासूनच्या प्रवासात लष्कराने या टीमसाठी संरक्षणाबरोबरच डॉक्‍टर आणि तज्ज्ञांचे पथकही दिले होते. सियाचीनमध्ये कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळणे, हा आमच्यासाठी सर्वोच्च अभिमानाचा आणि गौरवास्पद क्षण होता, अशी भावना टिळेकर यांनी व्यक्त केली.

Web Title: pune news marathi actress in siachen