...मग मराठी शाळा वाढणार कशा? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

पुणे - ""मराठी ही आपली मातृभाषा आहे. तिचा अभिमान असलाच पाहिजे; पण हल्लीच्या शिक्षकांना "मी मराठीचा शिक्षक का झालो' असा प्रश्न पडत असेल. पालक आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये दाखल करत नसतील तर मराठी शाळा वाढणार कशा? हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे,'' अशा शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मराठी भाषेच्या सद्य:स्थितीबाबत खंत व्यक्त केली. 

"पुणे बुक फेअर'चे उद्‌घाटन रावते यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनिताराजे पवार, "मराठी भाषा संवर्धन समिती'चे अनिल गोरे, संयोजक पी. एन. आर. राजन उपस्थित होते. 

मराठी भाषेसमोरील वेगवेगळ्या प्रश्‍नांचा आढावा घेत रावते यांनी राष्ट्रभाषेच्या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले, ""जगभरातील प्रत्येक देशाला स्वतःची अधिकृत राष्ट्रभाषा असताना भारतात मात्र स्वतःची अधिकृत राष्ट्रभाषा नसावी, हे मोठे दुर्दैवी आहे. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, ती संपर्कभाषा आहे; हे ध्यानात घ्यायला हवे.'' 

"पुणे बुक फेअर'मध्ये मराठी, हिंदीसह विविध भाषांतील पुस्तकांचा खजिना उपलब्ध झाला असून तो गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 15 ऑक्‍टोबरपर्यंत पाहायला मिळेल.

Web Title: pune news marathi school