मराठी शाळांचा ‘सोशल’ आविष्कार

प्रसाद पाठक
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - मराठी माध्यमाच्या शाळा आता ‘डिजिटल’च्या दिशेने पाऊल टाकत आहेत. वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पर्यावरणीय उपक्रम, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, खेळांतील प्रावीण्य, शाळास्तरावर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी या शाळा सोशल मीडियाचा वापर करू लागल्या आहेत. शिक्षक, पालकांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तसेच, शाळेचे फेसबुक पेज तयार करून आजी-माजी विद्यार्थ्यांना जोडण्यात येत आहे. ई-लर्निंगच्या माध्यमातून नवनवे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. 

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ई-लर्निंगला प्राधान्य देण्यात येते. त्याप्रमाणे पालकांच्या, माजी विद्यार्थ्यांच्या आणि शाळा प्रशासनाच्या प्रयत्नातून मराठी शाळांचा ‘डिजिटायझेशन’कडे कल वाढू लागला आहे. विशेष म्हणजे येथे सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. शाळांत साजरे होणारे सण-उत्सव सोशल मीडियावरून ‘शेअर’ केले जात आहेत.

डिजिटल ग्रंथालये, फिरती प्रयोगशाळा, शाळांची स्वतंत्र संकेतस्थळे, यावरून पाठ्यपुस्तिका तसेच इतर माहितीचा खजिनाही विद्यार्थ्यांसाठी खुला झाला आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक आणि कौशल्यविकास घडावा, या उद्देशाने शाळास्तरांवरून वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तयार करून घेण्यात आले आहेत.

आमच्या शाळेची ‘डिजिटल स्कूल’ अशी ओळख होऊ लागली आहे. आम्ही तेजोनिधी हे ई-मॅगझिन सुरू केले आहे. संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांचे लेख, मनोगते त्यावर वाचता येतात. डिजिटलमुळे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती, स्पर्धात्मक मार्गदर्शन करणे सोपे झाले आहे. शाळेचा परिसर वाय-फाय करण्याचा प्रयत्न आहे. पालक, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून ई-लर्निंगचे वर्ग सुरू झाले.
- तिलोत्तमा रेड्डी,  मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग  

भाषा, शास्त्र, गणित यांसारखे विषय, मनोरंजनात्मक माहिती ई-लर्निंगद्वारे देतो. 
काही विषयांच्या फिल्म्सही दाखवितो. शिक्षण विवेक या मासिकातून मुलींचे 
लेख प्रसिद्ध करतो.
- नंदिनी मकलूर,  मुख्याध्यापिका, नूमवि मुलींची प्रशाला   

डिजिटल ग्रंथालय करत आहोत. २५ हजार पुस्तकांपैकी आठ हजार पुस्तकांचे डिजिटायझेशन झाले आहे. ‘अगस्ती’ ही फिरती प्रयोगशाळाही सुरू केली आहे. माजी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांचा फेसबुक व व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, त्याद्वारे शाळेच्या उपक्रमांविषयीची माहिती सोशल मीडियावरून देत आहोत.
- जयश्री शिंदे, मुख्याध्यापिका, रेणुका स्वरूप गर्ल्स स्कूल

मराठी शाळा  ‘डिजिटली सबळ’!
जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून स्कूल व्हॅन कुठंवर आली याची माहिती मोबाईलवर
शाळेतील महत्त्वाचे निर्णय आणि घडामोडींची माहितीही मोबाईलवर
व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षक-पालक ‘कनेक्‍टेड’

Web Title: pune news marathi school social media