चॉकलेट, गिफ्ट बॉक्‍स अन्‌ कॅंडल्स

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

पुणे - ख्रिसमसनिमित्त आकर्षक रंगांच्या कागदामध्ये सजवलेल्या टिंगमिंगल चॉकलेट, सांता बास्केट, ऑरेंज बॉल्सचे ‘गिफ्ट बॉक्‍स’, ग्रीटिंग, ख्रिसमस ट्री, सॅंटा बॉल अन्‌ तितक्‍याच ‘डेकोरेटिव्ह’ कॅंडल्स! एव्हरग्रीन कॅप, सांताक्‍लॉज म्युझिकल बटवा, ख्रिसमस रिंगटोन... यासह विविध वस्तूंनी सध्या लष्कर भागातील बाजारपेठ सजली आहे. खरेदीसाठी आबालवृद्धांची पावले मध्य भागात, रविवार पेठ आणि लष्कर भागातील बाजाराकडे वळू लागली आहेत. 

चॉकलेटची ‘न्यारी दुनिया’ 
ख्रिसमस स्पेशल चॉकलेट सध्या बाजारात उपलब्ध आहेत. बास्केट, चॉकलेट बॉल्स, ऑरेंज बॉल्स, असे विविध आकारांतील त्यांचे आकर्षक ‘गिफ्ट पॅक’ नजरेस भरतात. काही वर्षांपासून ख्रिसमसनिमित्त पुण्यात खास अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, थायलंड यांसह अनेक देशांमधील चॉकलेट दाखल होत आहेत. विविध रंग व चवींची चॉकलेट लहानग्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

आकर्षक भेटवस्तू 
आकर्षक भेटवस्तूंसह विविध प्रकारच्या शुभेच्छापत्रांना सध्या मागणी वाढली आहे. त्यांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. यात स्टार, बॉल, हॅंगिंग बेल्सदेखील आहेत. तसेच ख्रिसमस बेल्सचेदेखील विशेष आकर्षक असून त्या विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. सिल्व्हर आणि गोल्डन बेल्सला विशेष मागणी आहे. याबरोबरच सॅंटाची एव्हरग्रीन कॅप मुलांचे लक्ष वेधून घेत आहे. सॅंटाचे चित्र असलेले बॉल्सदेखील गिफ्ट म्हणून उपलब्ध आहेत. सांताक्‍लॉज डान्स करताना, सांताक्‍लॉज टेडी बेअर, सांताक्‍लॉजचे मास्क, आकर्षक जिंगल बेल, सांताक्‍लॉज म्युझिकल बटवाही बाजारात उपलब्ध आहे. तसेच फॅमिली व मित्रपरिवारात भेटवस्तू देण्यासाठी आइस्क्रीम बाउल, डिनर सेट, टी सेट यांसारख्या आकर्षक भेटवस्तूंना मागणी आहे. 

भेटवस्तू, सजावट साहित्याचे दर 
 बॉल्स : १०० रुपये 
 ख्रिसमस ट्री : ७५ ते १२०० रुपये 
 सांताक्‍लॉज टॉइज : ७५ ते ४०० रुपये 
 सांताक्‍लॉज ड्रेस (लहान-मोठे) ः २०० ते ६०० रुपये 
 येशू विथ फॅमिली स्टॅच्यू ः १०० ते ८५० रुपये 
 जिंगल बेल, कॅप, मास्क ः ६० ते २०० रुपये 
 डेकोरेशन सेट ः २०० ते १००० रुपये 
 बेल्स : १०० ते ५०० रुपये 
 कॅंडल्स : २०० ते ६०० रुपये 
 सांता कॅप : ५० ते १५० रुपये 

Web Title: pune news market ready for christmas