शहिदाच्या घरी दिवाळीचा पहिला दिवा पेटला... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

हडपसर - देशासाठी शहीद झाल्याने सैनिकाच्या घरातील कर्ता दिवा विझलेला असतो. त्या सैनिकाच्या घरी दिवाळीनिमित्त एक कृतज्ञतेचा दिवा पेटवून अशा कुटुंबाप्रती आस्था प्रत्येकाने जपली पाहिजे, या हेतूने "दिवाळीचा पहिला दिवा शहिदाच्या कुटुंबासाठी' हा उपक्रम फुरसुंगी येथील शहीद जवान सौरभ फराटे यांच्या कुटुंबासोबत राबविण्यात आला. सैनिक मित्रपरिवार व राष्ट्रप्रेमी युवा मंचाच्या वतीने  त्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या उपक्रमातून आम्ही शहिदांच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याचा छोटासा प्रयत्न करत असल्याचे मत सैनिक मित्रपरिवाराचे संस्थापक आनंद सराफ यांनी या वेळी व्यक्त केले. या प्रसंगी भोला वांजळे, दादा पोकळे, पराग गुजराथी, मनोज हेंद्रे, देवेंद्र शेळके, प्रशांत सुरसे, साई कामठे, गोविंद वांजळे, प्रज्ञा काळे, धनश्री हेंद्रे, स्वाती ओतारी, पल्लवी सुरसे, मनीषा वांजळे उपस्थित होते. 

यानिमित्त शहीद फराटे यांच्या घरी घरासमोर रांगोळी काढून दीपोत्सव करण्यात आला. आकाशकंदील प्रज्वलित करून शहीद फराटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सौरभ यांची आई मंगल फराटे, वडील नंदकुमार फराटे व भाऊ रोहित फराटे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना दिवाळीचे फराळ व भेट वस्तू देण्यात आल्या. "तुम्ही एकटे समजू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे', असा आधार देत कार्यकर्त्यांनी सौरभ फराटे "अमर रहे...', "भारत माता, की जय' अशा घोषणा दिल्या. वांजळे म्हणाले, ""देशासाठी बलिदान देणारे शहीद जवान व त्यांच्या कुटुंबाप्रती प्रत्येकाने आस्था ठेवावी. माणूस म्हणून प्रत्येकाने अशा जवानांच्या घरी आधाराचा दिवा लावून खारीचा वाटा उचलण्यात कमी पडून नये. मग तो दिवा सन्मानाचा असेल, आर्थिक मदतीचा असेल अथवा मानसिक आधाराचा असेल.''

Web Title: pune news martyrs family