'तीज सत्तु सजावट’ स्पर्धेला मारवाडी समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद   

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

या स्पर्धेत मुख्यतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील महिलांनी भाग घेतला. या स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. महिलांनी पदार्थ बनवताना त्याचे छायाचित्रण करून सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या खाद्य पदार्थांची माहिती दिली

नवी सांगवी - पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगती मंडल व सांगवी परिसर महेश मंडल आयोजित संपूर्ण भारतातील मारवाडी समाजाकरीता ‘तीज सत्तु सजावट’ स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

श्रावणी कृष्ण पक्षातील तीज (तृतीया) या दिवशी येणार्‍या सणाला मारवाडी समाजात मोठे महत्व आहे. या दिवशी महिला दिवसभर उपवास धरून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. त्याला सत्तू तीज असे म्हटले जाते. सायंकाळी विविध धान्यापासून बनवलेल्या शिवलिंगच्या आकारासारख्या त्या पदार्थाला सत्तू असे म्हणतात. 

या पदार्थाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने सजवले जाते. अशी आगळीवेगळी स्पर्धा महेश मंडलतर्फे ऑनलाइन टैलेंट चरिएट या अ‍ॅप वर घेण्यात आली.  

या स्पर्धेत मुख्यतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यातील महिलांनी भाग घेतला. या स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. महिलांनी पदार्थ बनवताना त्याचे छायाचित्रण करून सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या खाद्य पदार्थांची माहिती दिली. त्या छायाचित्रणास जनतेतून मते मागविण्यात आली. स्पर्धेचे पंच हेही ऑनलाइन होते. पंच म्हणून ब्रम्हानंद लाहोटी व सुप्रिता धूत यांनी कामगिरी पार पाडली.  

स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगति मंडलाचे अध्यक्ष नरेंद्र चाण्डक , ओम बंग , टैलेंट चेरियटचे अनूप धीरन , पूजा धीरन ,सांगवी परिसर महेश मंडलचे अध्यक्ष सतीश लोहिया, दिपेश मालाणी, मुकुंद तापड़िया यांनी परिश्रम घेतले.   

स्पर्धेतील विजेत्या महिलांची नावे

प्रथम - किर्ती जंवर- परळीवैजनाथ

द्वितीय - जयश्री चितलांगे - लाडकारंजा

तृतीय- श्रुति बांगड़ पुणे 

Web Title: pune news; marwadi festival