विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती गुल!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात गेल्या चाळीस वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच गणिताची काठिण्य पातळी कमी केली आहे. परिणामी विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती कमी होऊन मूल्यमापन पद्धती त्यांना उपयुक्त ठरणारी आहे. शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांच्या या अभ्यासक्रमाकडे लक्ष दिल्यास त्यांच्यावर ताण येणार नाही.

नववीची पाठ्यपुस्तके यंदा बदलली असून, मूल्यमापन पद्धतीही बदलली आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. ऐंशी टक्के शाळांमध्ये चाचणी परीक्षाही झाल्या आहेत. मात्र, पहिल्या सत्रात सण- उत्सव असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचाही ताण येऊ शकतो, तो येऊ नये. याबाबत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सचे माजी पर्यवेक्षक दीनानाथ गोरे म्हणाले, ‘‘मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घ्यावा. पहिल्या सत्रात सण- उत्सव असल्याने जेमतेम दीड महिना विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळू शकतो. दुसऱ्या सत्रातील परीक्षेत पहिल्या सत्रातील वीस टक्के प्रश्‍न विचारले जातील. ऐंशी टक्के प्रश्‍न दुसऱ्या सत्रातील असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्र, गणित व विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास रोजच्या रोज करणे आवश्‍यक आहे.’’

पहिल्या सत्रातील पेपर विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीत सोडवून आणण्यास सांगितले, तर तो ‘गृहपाठ’च त्यांच्याकडून होऊ शकेल. परिणामी, विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: pune news math student