शिक्षणामुळेच स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व - महापौर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान देतात. स्त्रिया अशी वागणूक कुठपर्यंत सहन करणार? म्हणूनच आज स्त्री तिच्या हक्कांसाठी पेटून उठली आहे. तिला शिक्षणाचे महत्त्व कळाले आहे. ती तिचे अस्तित्व निर्माण करीत आहे. हा बदल शिक्षणामुळेच घडला असून, शिक्षणाचा पाया आपण आणखी खोलवर रुजवला पाहिजे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.

सरस्वती मंदिर संस्थेच्या सरस्वती मंदिर नाईट कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे आयोजित महिला सबलीकरण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. संस्थेचे प्रा. विनायक आंबेकर, प्राचार्य पांडुरंग शेंडे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रा. धनंजय लोखंडे, प्रा. विलास आढाव, डॉ. दीपक पाटील, अयोध्या जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: pune news mayor women