प्रसार माध्यमे ही समाजबदलाची साधने- कवटे 

संदीप जगदाळे
मंगळवार, 27 मार्च 2018

हडपसर - प्रसार माध्यमे ही समाजबदलाची साधने आहेत. लोकजागृतीसाठी विविध प्रसार माध्यमांचे मोठे योगदान लाभले आहे. माहिती देणे, लोकशिक्षण आणि मनोरंजन या वैशिष्ट्यांमुळे समाजमनावर त्यांचा प्रभाव दिसून येतो. दिव्यांगाच्या पुनर्वसनात प्रसार माध्यमांनी अपंग  क्षेत्राकडे अधिक लक्ष दिल्यास, अधिकाधिक दिव्यांग व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशीक उपआयुक्त पी. एस. कवटे यांनी व्यक्त केले. 

भारतीय पुनर्वास परिषद, नवी दिल्ली व श्री सदगुरू साईबाबा सेवा ट्रस्ट संचलित कॅालेज ऑफ स्पेशल एज्यूकेशन यांच्या संयुक्त विदयमाने आयोजीत तिन दिवसीय निरंतर पुनर्वसन प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत प्रसार माध्यमे व अपंगत्व या विषयावरील कार्यशाळेत कवटे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंत पाटोळे, अपंग कल्याण आयुक्तालयाचे निवृत्त निरिक्षक मधुकर काटवटे, अपंग हक्क सुरक्षा समिती अध्यक्ष हरिदास शिंदे, समन्वयक रोहित जाधव, बाळासाहेब जगताप, मुख्याध्यापक महेश कांबळे उपस्थित होते. 

काटवटे म्हणाले, दिव्यांगासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमीका महत्वाची आहे. तसेच दिव्यांगामधील सुप्त कलागुण आणि उपल्बध शक्ती समाजासमोर आणण्यासाठी प्रसार माध्यमांनी लक्ष दयायला हवे. तरच त्यांच्यातील उपल्बध शक्तीचा वापर उत्पादक शक्तीत होईल. समाजात ते ताट मानेने व स्वाभिमानाने जगू शकतील.

शिंदे म्हणाले, अपंग पुनर्वसन ही केवळ वैद्यकीय समस्या नाही, तर तो एक सामाजिक व आर्थिक प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या समस्येकडे केवळ अपंग व्यक्तींना निदान, चिकित्सा, सेवासुविधा पुरविणे इतक्या मर्यादित स्वरूपात पाहिले जात नाही. अपंग व्यक्तीच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी सामाजिक स्वीकारार्हता वाढविणे आणि मानवी हक्काबाबत कायदेशीर तरतुदी करणे याला महत्त्व दिले जात आहे. माध्यमांच्या सहयोगाशिवाय हे शक्य नाही. माध्यमे आणि दिव्यांग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी हातात हात घालून काम केल्यास दिव्यांग व्यक्तींचे अनेक प्रश्न सुटतील.

Web Title: pune news media entertainment p.c.katwe