पुणे : मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी फुटली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

कोथरूड परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम 
पौड रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ मेट्रोच्या ठेकेदाराकडून जलवाहिनी फुटल्यामुळे कोथरूड, एरंडवणा, कर्वेनगर परिसराचा पाणी पुरवठा शुक्रवारी सायंकाळी बंद करण्यात आला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी विलंबाने पूर्ण होण्याची शक्‍यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोथरूड, एरंडवणा, कर्वेनगर परिसराचा पाणीपुरवठा शनिवारी (ता. 24 ) सकाळी उशीरा व कमी दाबाने होईल, असे महापालिकेने कळवले आहे.

पुणे : पौड रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ मेट्रो मार्गाच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून शुक्रवारी दुपारी जलवाहिनी फूटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे रस्त्यावर 25 - 30 फुट उंचीचे पाण्याचे कारंजे उडत होते. तसेच मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. 

ही घटना घडल्यावर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्न करीत तासाभरात त्यांनी पाण्याची गळती थांबवली. या बाबतचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. पौड रस्त्यावर वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्पात खांबाचे काम सुरू असताना सायंकाळी चारच्या सुमारास खोदाई करताना ठेकेदाराच्या जेसीबी यंत्राचा 27 इंच व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागल्याने ही जलवाहिनी फुटली. या वेळी 25 ते 30 फूट उंचीचे कारंजे उडाले. 

अचानक फुटलेल्या या जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह पौड रस्त्यावर वाहू लागल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने पाणीपुरवठा बंद करीत जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात आले.

कोथरूड परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम 
पौड रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ मेट्रोच्या ठेकेदाराकडून जलवाहिनी फुटल्यामुळे कोथरूड, एरंडवणा, कर्वेनगर परिसराचा पाणी पुरवठा शुक्रवारी सायंकाळी बंद करण्यात आला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी विलंबाने पूर्ण होण्याची शक्‍यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोथरूड, एरंडवणा, कर्वेनगर परिसराचा पाणीपुरवठा शनिवारी (ता. 24 ) सकाळी उशीरा व कमी दाबाने होईल, असे महापालिकेने कळवले आहे.

Web Title: Pune news metro work in kothrud pipeline busted