मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन

पौड रस्ता - मेट्रो प्रकल्प भूमिपूजनप्रसंगी (डावीकडून) श्रीनाथ भिमाले, डॉ. सिद्धार्थ धेंडे, मेधा कुलकर्णी, गिरीश बापट, मुक्‍ता टिळक, मुरलीधर मोहोळ आणि दीपक मानकर.
पौड रस्ता - मेट्रो प्रकल्प भूमिपूजनप्रसंगी (डावीकडून) श्रीनाथ भिमाले, डॉ. सिद्धार्थ धेंडे, मेधा कुलकर्णी, गिरीश बापट, मुक्‍ता टिळक, मुरलीधर मोहोळ आणि दीपक मानकर.

पुणे/पौड रस्ता - 'मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे शहरातील वाहतूक कोलमडणार नाही, याची काळजी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिस यंत्रणांनी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी केली. तसेच प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधितांना सुनावले.

वनाज ते रामवाडी मेट्रोमार्गाचे भूमिपूजन पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगर चौकाजवळ बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आमदार मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक दीपक मानकर, दिलीप वेडे-पाटील, डॉ. श्रद्धा प्रभुणे, अल्पना वरपे आदी उपस्थित होते.

बापट म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केल्यानंतर मेट्रो मार्ग उभारण्याच्या तांत्रिक कारणांमुळे थोडासा वेळ लागला. दरम्यान मार्ग आणि त्याची चाचणी घेण्यात आली. कचरा डेपो येथील जैववैविधतेची (बीडीपी) जागा शिवसृष्टीसाठी देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे शिवसृष्टी व मेट्रो स्टेशनचे काम एकाच वेळी सुरू करण्यात येईल. प्रत्यक्ष जेथे काम सुरू असेल तेथील वाहतुकीला होणारा अडथळा कमी करण्यासाठी विशेष पोलिस नेमण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेणार आहोत. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला वेग येईल.''

शिवसृष्टीबाबत लवकरच निर्णय
दरम्यान, कोथरूड येथील शिवसृष्टीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मानकर यांनी बापट यांच्याकडे केली. त्यावर बापट म्हणाले, 'शिवसृष्टीसंदर्भात सकारात्मक निर्णय होईल. मुख्यमंत्री परदेशात आहेत. ते आल्यानंतर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com