एकबोटेंच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या दंगलीनंतर एकबोटे यांच्यासोबत मोबाईलवर संपर्कात असलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची रविवारपासून धरपकड करीत कसून चौकशी सुरू केली आहे. हवेली पोलिसांनी याप्रकरणी दहा ते पंधरा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.

कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर एकबोटे यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकबोटे यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. गेल्या 22 जानेवारी रोजी न्यायालयाने तो अर्ज फेटाळला.

त्यानंतर एकबोटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांकडून एकबोटे यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा शिक्रापूर पोलिसांनी केला होता. मात्र, अद्याप अटक न झाल्यामुळे पोलिसांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्याशी मोबाईलवर संपर्कात आलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हवेली पोलिसांनी रविवारी रात्री काही जणांना ताब्यात घेतले होते. तसेच, काहींना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते.

Web Title: pune news milind ekbote activists arrested police crime