मिलिंद एकबोटेंना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एकबोटेंना न्यायालयात आज(बुधवार) हजर केले असता न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली.  

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेत असलेले समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एकबोटेंना न्यायालयात आज(बुधवार) हजर केले असता न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली.  

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.  सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर बुधवारी एकबोटे यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. एकबोटेंचे कॉल रेकॉर्ड तसेच वितरित झालेली पत्रके याबाबत पोलिसांना चौकशी करायची आहे, त्यामुळे पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. 

मात्र एकबोटेंचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नाही, तसेच कॉल रेकॉर्ड्स मोबाईल कंपन्यांकडूनही मागवता येऊ शकतो, त्यासाठी एवढे दिवस पोलिस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद एकबोटे यांच्या वकिलांनी केल्यांनातर अखेर एकबोटेला 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

एकबोटेंना २१ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर बुधावारी त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, कोर्टाने एकबोटेंना १४ दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावली. 

दरम्यान, एकबोटेंना तीन दिवसापूर्वी न्यायालय परिसरात एका तरुणाने काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आज न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.

Web Title: pune news milnid ekbote police custody koregaon bhime riot case