पुणे शहरातून थंडीचा हळूहळू काढता पाय

पुणे शहरातून थंडीचा हळूहळू काढता पाय

पुणे- थंडी शहरातून आता हळूहळू काढता पाय घेत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदले आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये पुण्यात किमान तापमानाचा पारा १.८ अंश सेल्सिअसने वाढला. शिवाजीनगर येथील वेधशाळेत शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान ११.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

मध्य केरळ ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अंतर्गत कर्नाटक आणि मराठवाड्यातही याचा प्रभाव आहे. त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. पुण्यात पुढील दोन ते तीन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यातून थंडीचा कडाका कमी होईल. शहर आणि परिसरातील किमान तापमान येत्या सोमवारपर्यंत (ता. १५) १४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर आकाश ढगाळ होईल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पहाटे गारठा, दुपारी चटका 
पुण्यात किमान तापमान वाढत असले तरीही पहाटे गारठा जाणवतो. तसेच, दुपारी मात्र उन्हाचा चटका आता बसतो. त्यामुळे सकाळी गारठा आणि दुपारी चटका अशी अवस्था पुणेकर अनुभवत आहेत. पुण्यात कमाल तापमान ०.८ अंश सेल्सिअसने वाढून ३२.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com