पुणेः अल्पवयीन गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

देहूरोडची घटना; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

देहूरोड (पुणे) : पूर्ववैमनस्यातून सुभान शेख उर्फ शब्बीर उर्फ रोहीट्या अमिन सोलंकी (वय 17, सध्या रा. गांधीनगर देहूरोड. मूळगाव विठ्ठलवाडी, देहू) याला नऊ जणांनी दांडक्‍याने मारहाण केली. डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. 11) रात्री साडेनऊच्या सुमारास देहूरोड येथील सेंट्रल चौकात घडली. पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून अंकुश नरेश बिडलान (वय 19, रा, पार्शिचाळ, देहूरोड) याला अटक केली आहे.

देहूरोडची घटना; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

देहूरोड (पुणे) : पूर्ववैमनस्यातून सुभान शेख उर्फ शब्बीर उर्फ रोहीट्या अमिन सोलंकी (वय 17, सध्या रा. गांधीनगर देहूरोड. मूळगाव विठ्ठलवाडी, देहू) याला नऊ जणांनी दांडक्‍याने मारहाण केली. डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. 11) रात्री साडेनऊच्या सुमारास देहूरोड येथील सेंट्रल चौकात घडली. पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून अंकुश नरेश बिडलान (वय 19, रा, पार्शिचाळ, देहूरोड) याला अटक केली आहे.

याप्रकरणी मृत सुभान याचा मित्र चेतन उर्फ सोन्या बाळू पांडे (वय 20 वर्षे, रा. देहु, कुंभारवाडा ता. हवेली जि पुणे) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथून दुचाकींवर आलेल्या आरोपी अंकुश बिडलानसह त्याच्या साथीदारांनी सुभान सोलंकी याला नागरी वस्तीपासून निर्जन ठिकाणी असलेल्या सेन्ट्रल चौकात गाठून दांडक्‍याने बेदम मारहाण करीत डोक्‍यात दगड घालून ठार केले. यानंतर सर्वजण पळून गेले. घटनेची माहिती मिळताच देहूरोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगुळकर, पोलिस निरीक्षक अरुण मोरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. चौकात नाकाबंदी करीत सुभानच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी पिंपरीतील वायसीएम मध्ये पाठविला. मृतदेह नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान आरोपी बिडलानला सोमवार (ता. 18) पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश वडगाव मावळ न्यायलयाने दिला आहे.

सुभान शेखवर तब्बल आठ गुन्हे :
मृत सुभान शेख उर्फ शब्बीर उर्फ रोहीट्या अमिन सोलंकी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. विविध गुन्ह्यांच्या माध्यमातून त्याने मोठी दहशत निर्माण केली होती. त्यामुळे पोलिसही जेरीस आले होते. देहूरोड पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद असलेल्या माहितीनुसार सुभानविरुद्ध प्राणघातक हल्याचे दोन गुन्हे, मारहाणीचे दोन गुन्हे, लोकसेवकावर हल्याचा एक गुन्हा, जबर मारहाणीचा एक गुन्हा, दरोड्याचा एक गुन्हा आणि दरोडा व प्राणघातक हल्ला असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. या सगळ्याच गुन्ह्यात त्याला पोलिसांकडून अटक झाली होती.

वाढदिवसाच्या पार्टी नंतर झाला खून :
सूत्रांच्या माहितीनुसार मृत आरोपी सुभान शेख याने अंकुश नरेश बिडलान याला कोयत्याचा धाक दाखवून पर्शिचाळ येथून दुचाकीवर देहूरोड मामुर्डी रस्त्यावरील श्री शिवाजी विद्यालयासमोर आणून मारहाण केली. नंतर अंकुशला सोडून तो गांधीनगर (देहूरोड) येथे मित्राच्या पार्टीसाठी गेला व नंतर सेन्ट्रल चौकात गेला. यादरम्यान मागावर असलेल्या अंकुश व त्याच्या साथीदारांनी सुभानला सेन्ट्रल येथे गाठून हल्ला केला. दरम्यान, मारहाणीत जबर जखमी झाल्याने सुभानचा जागेवरच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान वाढदिवसाची पार्टी झाल्यानंतर सूभानचा खून झाल्याच्या वृत्ताला पोलिस निरीक्षक मोरे यांनीही दुजोरा दिला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
वैचारिक मतभेदांचे बळी
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच !
मदतीचा नव्हे... खरोखरचा हात
गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार
कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी
पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे
बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी
पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती
राज्यात तात्पुरते भारनियमन; वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन
दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण

Web Title: pune news Minor premeditated murder of minors