पुण्यातील बेपत्ता डॉक्टरचा आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे : मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असेलल्या धायरी येथील एका डॉक्टरचा मृत्युदेह शुक्रवारी (ता. 9) रात्री खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ आढळून आला. डॉ. देवीदास शेंडगे (वय 47, रा. रायकरनगर, धायरी) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

शेंडगे हे दोन दिवसांपुर्वी खानापूर येथे एका कामानिमित्त गेले होते. त्याविषयी त्यांनी त्यांच्या पत्नीस पूर्वकल्पना दिली होती. मात्र, दोन दिवस उलटले तरीही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने अभिरुची पोलिस चौकीत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री पोलिसांना खडकवासला धरणाजवळ मोटार आढलून आली. त्यामध्ये डॉ. शेंडगे यांचा मृत्युदेह होता. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालाद्वारे समजेल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: pune news missing doctor dr devidas shendge body found