मराठवाडा जनविकास संघातर्फे सफाई कामगारांना मिठाई वाटप

मिलिंद संधान
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

वंचित घटकातील ही लहान मुले उद्याचे उज्ज्वल भविष्य आहेत. या ४५ मुलांची जबाबदारी मराठवाडा जनविकास संघ घेत आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.

नवी सांगवी : मराठवाडा जनविकास संघ संचालित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने दिवाळी सणापासून वंचित असणाऱ्या बालक व सफाई कामगारांना पोलीस उपायुक्त राम मांडुरके, शारदाताई मुंडे यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. 

पिंपळे गुरव येथील संघाच्या कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, भैरुजी मंडले, वामन भरगांडे, अभिमन्यु गाडेकर, शिवाजी घोडके, कृष्णा खडसे, हरिश्चंद्र येवले, सखाराम वालकोळी, आदिती निकम, दीपक जाधव, संतोष भोरे आदी उपस्थित होते .   

पोलीस उपायुक्त मांडुरके म्हणाले, "वंचित घटकातील ही लहान मुले उद्याचे उज्ज्वल भविष्य आहेत. या ४५ मुलांची जबाबदारी मराठवाडा जनविकास संघ घेत आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. तसेच सफाई कामगार बंधू भगिनी करीत असलेल्या कार्याची घेतलेली दखल ही त्यांच्या प्रामाणिक कामाची पोचपावती आहे." कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले. 

Web Title: pune news mithai distribution to sweepers