महाविद्यालयीन आठवणींना उजाळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

पुणे - नाटकाच्या सरावासाठी मेहनत करून महाविद्यालयासाठी मिळविलेले पारितोषिक... तास बुडवून कट्ट्यावर रंगविलेल्या गप्पा... शिक्षकांच्या कान उघडणीचा पुढील आयुष्यात झालेला उपयोग आणि मित्रांबरोबर केलेली धमाल-मस्ती... या आठवणींना तब्बल 25 वर्षांनी उजाळा मिळाला. 

निमित्त होते, मॉडर्न महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतून 25 वर्षांपूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रौप्यमहोत्सवी मेळाव्याचे. 

गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला सुमारे दोन लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या वेळी माजी प्राचार्य प्रा. जगदीश चिंचोरे, प्रा. दत्तात्रेय लिमये, प्रा. गोसावी, प्रा. जयंत जोर्वेकर आदींचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह आणि नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. राजेंद्र झुंजारराव, सोहळा समिती अध्यक्ष ऍड. शिवराज कदम- जहागीरदार आदी उपस्थित होते. 

प्रा. एकबोटे म्हणाले, ""तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, त्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने संस्था काम करीत आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्याने आज हे महाविद्यालय प्रगती पथावर आहे. शिक्षणाला बाजारूपण नको, तर प्रतिष्ठा हवी, त्यासाठी प्रयत्न करा.'' 

प्रा. झुंजारराव म्हणाले, ""महाविद्यालयाला नॅककडून ए प्लस दर्जा मिळाला आहे. त्याचे बहुतांश श्रेय संस्थेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना जाते. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्यासह नावलौकिक मिळविलेला आहे.'' दरम्यान, संस्थेचे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी इच्छा माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

वैशाली म्हस्के, विनायक वाघुले, सुजित म्हस्के, जयेश केळकर, सुनील देसाई, मंदार येळसंगीकर, गौरी शेटे यांनी याचे आयोजन केले. मनोज भगली यांनी सूत्रसंचालन, तर दत्तात्रेय भापकर यांनी प्रास्ताविक केले. ऍड. कदम-जहागीरदार यांनी आभार मानले.

Web Title: pune news Modern College