दोन-तीन दिवसांत मॉन्सून दिल्लीत? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर अरबी समुद्र, सौराष्ट्र, कच्छ, गुजरातचा उर्वरित भाग, मध्य प्रदेशचा आणखी काही भागात आणि दक्षिण राजस्थानच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून राजस्थानच्या उत्तर भागात तसेच दिल्लीसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीरपर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोकण-गोव्यात काही ठिकाणी 

मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणात पेण, हर्णे, दापोली, पोलादपूर परिसरात जोरदार पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्रातही लोणावळा, महाबळेश्‍वर, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा परिसरात पाऊस झाला. 

कोकण-गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी बुधवारी (ता. 28) आणि गुरुवारी (ता. 29) मुसळधार पाऊस होईल. जुलै महिन्याच्या सुरवातीला पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, पुणे आणि परिसरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. 

Web Title: pune news monsoon