यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार

स्वप्निल जोगी
शनिवार, 27 मे 2017

पुणे: आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळिराजासाठी यंदा आनंदाची वार्ता आहे. यंदा राज्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असून, टक्केवारीनुसार 102 टक्के पाऊस होण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शनिवारी व्यक्त केला.

राज्यभरात या वर्षी मॉन्सूनचे आगमन काहीसे लवकर म्हणजे 2 जून रोजीच होणार आहे. विशेष म्हणजे, पुण्यात सरासरीच्या 105 टक्के पाऊस होणार असून, पुरेसे पर्जन्य असल्यामुळे धरणेही भरण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

या वर्षी मॉन्सून कालावधीत "एलनिनो'चा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे साबळे म्हणाले. पाऊस चांगला असला, तरी वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून व जुलै महिन्यात पावसात खंड पडेल, असेही त्यांनी सांगितले. विदर्भ व मराठवाड्यात हा खंड मोठा राहण्याची शक्‍यता आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड, असे हवामान असेल. पुण्यात जून ते सप्टेंबरमधील पावसाची दरवर्षीची सरासरी 566 मिमी एवढी असते. यंदा अंदाजे 594 मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. जेथे 65 मिमीपर्यंत पाऊस होईल, तेथे लगेच पेरण्या करणेसुद्धा शक्‍य होईल, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्याः

Web Title: pune news monsoon department rain dr ramchandra sabale