खोदाई शुल्क सवलतीने  महावितरणची कामे मार्गी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पुणे - "इन्फ्रा टू'च्या माध्यमातून पुणे शहरातील चार नवीन उपक्रेंद्रांच्या उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत. एकात्मिक ऊर्जा विकास योजना (आयपीडीएस) अंतर्गत 128 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. पुणे महापालिकेने महावितरणला खोदाई शुल्कात सवलत दिल्याने ही कामे आता मार्गी लागण्यासाठी सकारात्मक चिन्हे निर्माण झाली असून, यासंबंधीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. 

महावितरणकडून रस्ते खोदाईसाठी 2350 रुपये प्रतिमीटर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे महावितरणच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. यापूर्वी महापालिकेने पाच हजार 547 रुपये प्रतिमीटर शुल्काची मागणी केली होती; परंतु एवढे शुल्क देणे महावितरणला परवडणारे नव्हते. त्यामुळे शहरातील इन्फ्रा टू ची कामे रखडली होती. मात्र, आता खोदाई शुल्कात सवलत मिळाल्याने पुढील कामे मार्गी लागतील, असा विश्‍वास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

महावितरणकडे दरवर्षी दहा टक्‍क्‍यांनी वीजग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या विजेची गरज लक्षात घेता, वीज यंत्रणा सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच शहरासाठी सहा उपकेंद्रे, 72 नवीन रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) बसविणे, 15 रोहित्रांची क्षमता वाढविणे, 137 किलोमीटर उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी टाकणे, 14 किलोमीटर लघुदाब वीजवाहिनी भूमिगत टाकणे आदी कामे प्रस्तावित आहेत, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

Web Title: pune news MSEB