महावितरणच्या दुर्लक्षाचा कोंढवा-वानवडीकरांना फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे कोंढवा-वानवडी भागात १६ ते २४ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात औंध, बाणेर व बालेवाडीत ४५ ते ६० तास वीज गायब झाली होती. यंदाही बालेवाडीत जुलै महिन्यात १८ ते २४ तास वीज गेली. पंधरा दिवसांनंतर पाऊस आल्याने कोंढवा, वानवडी, बाणेर भागातील नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला.

देखभाल-दुरुस्तीच्या नावाने दर महिन्यात किमान दोन गुरुवारी विविध भागांत दिवसभर वीजपुरवठा खंडित केला जातो; मात्र इतर दिवशी तरी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. मुंबई, कोकण, महाबळेश्‍वरसह अनेक ठिकाणी पुण्याच्या कितीतरी पट जास्त पाऊस पडूनही तेथील वीज जात नाही. पुणे हे महावितरणचे सर्वाधिक ग्राहक संख्येचे शहर आहे. तरीही ग्राहकसेवेकडे महावितरणचे दुर्लक्ष होणे, हे  नेहमीचेच झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

पुणेकरांना अंधारात राहायची वेळ आणणाऱ्या महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच त्यांच्या पगारातून नुकसानभरपाई वसूल करावी. 
-विवेक वेलणकर,  अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Web Title: pune news mseb kondhwa