कर्जरोख्यांच्या माध्यमातून तिजोरीत 200 कोटी रुपये 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पुणे - शहरात राबविण्यात येणाऱ्या 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या कर्जरोख्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत मंगळवारी 200 कोटी रुपये जमा झाले. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी हा निधी वापरणार आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला गती येईल, असा विश्‍वास महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी व्यक्त केला. 

या योजनेसाठी कर्जरोखे घेण्यास रिझर्व्ह बॅंक आणि "सेबी'ने मंजुरी दिल्यानंतर महापालिका बॅंकिग आणि विमा क्षेत्रातील दोन संस्थांनी 7.59 टक्के दाराने महापालिकेचे कर्जरोखे घेण्यास सोमवारी मंजुरी दिली होती. त्यानुसार दोन्ही संस्थांकडून प्रत्येकी 100 कोटी रुपये कर्जरोखे घेण्यात आले असून, त्यानुसार 200 कोटी रुपये मंगळवारी महापालिकेच्या बॅंक खात्यात जमा झाले. त्यातून योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील विविध कामांना सुरवात करण्यात येणार आहे. या कामांसाठी ज्या प्रमाणात निधीची गरज आहे, त्यानुसार कर्जरोखे उभारणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या कर्जरोख्यांची नोंदणी येत्या गुरुवारी मुंबई शेअर बाजारात होईल. या प्रसंगी केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: pune news mukta tilak