शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त शहरात कार्यक्रमांची रेलचेल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या महिन्यात महापालिकेतर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरही त्यासाठी धूम असेल आणि शालेय विद्यार्थी, युवकांनाही या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सामावून घेतले जाणार असल्याचेही महापौर मुक्ता टिळक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पुणे - गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या महिन्यात महापालिकेतर्फे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरही त्यासाठी धूम असेल आणि शालेय विद्यार्थी, युवकांनाही या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने सामावून घेतले जाणार असल्याचेही महापौर मुक्ता टिळक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त महापालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा विशेष दोन कोटी रुपयांची तरतूद स्थायीचे अध्यक्ष मोहोळ यांनी केली आहे. महापौर टिळक यांच्या अध्यक्षतेखाली त्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देताना महापौर म्हणाल्या, ""गणेशोत्सवावर आधारित खास थीम सॉंग, लोगो निर्माण करणार आहे. हा उत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन, फेसबुक, इंस्टाग्राम यांचीही मदत घेतली जाईल. पुण्याची परंपरा म्हणून पाच हजार ढोल ताशांचा एकत्रित वादनाचा कार्यक्रम आयोजित करून त्याचा विक्रम "गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवण्याचाही प्रयत्न असेल. यंदा वसाहतींसाठीही स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आहे.'' शहराच्या मुख्य मार्गावरून दुचाकींची फेरी काढून सामाजिक संदेश देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. उत्सव शांततेने व्हावा आणि सर्व पुणेकरांना त्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. आयुक्त कुणाल कुमार यांनी यंदाचा गणेशोत्सव फक्त या महिन्यापुरता मर्यादित न राहता कार्यस्वरूपी लक्षात राहावा यासाठी गणपती भवन उभारणार असल्याचे सांगितले. 

छायाचित्रांमधून उलगडणार इतिहास 
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महापालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या इतिहासाची माहिती सांगणारे प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी ज्या मंडळांकडे किंवा व्यक्तींकडे उल्लेखनीय जुनी छायाचित्रे असतील त्यांनी ती महापौर कार्यालय किंवा श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात द्यावीत, असे आवाहन महापौरांनी केले. 

ब्रॅंड ऍम्बेसिडर सचिन तेंडुलकर? 
पुण्याच्या गणेशोत्सवाचा ब्रॅण्ड ऍम्बेसिडर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना करावे, असा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. उत्सवादरम्यान उपलब्धतेबाबतचा आढावा घेऊन येत्या दोन दिवसांत महापालिकेला कळवितो, असे तेंडुलकर यांनी सांगितल्याचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी स्पष्ट केले. 

Web Title: pune news mukta tilak ganeshotsav 2017