महापालिका रुग्णालयासाठी बाणेरला जागा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे - शहराच्या पश्‍चिम भागात ससून रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने मोठे रुग्णालय उभारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी बाणेरमधील सुमारे पाच एकर जागेचा प्रस्ताव सादर झाला आहे. महापालिकेतील प्रमुख अधिकारी येत्या चार दिवसांत त्या जागेची पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत. 

महापालिकेची आरोग्य सुविधा सुसज्ज करण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अर्थसंकल्पात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करून त्यासाठी आर्थिक तरतूदही केली आहे. तसेच, पश्‍चिम पुण्यात भव्य रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच एकर जागा हवी आहे. त्या संदर्भात मोहोळ यांनी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता शिवाजी लंके आदींबरोबर नुकतीच बैठक घेतली. त्यात बाणेरमधील पाच एकर जागेची पाहणी करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. तसेच, नायडू रुग्णालय आणि कमला नेहरू रुग्णालयांचा विस्तार करण्यात येणार आहे. ही रुग्णालये महापालिकेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात येतील, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. नियोजित महाविद्यालयाची सरकारी परवानगी, तसेच अन्य अत्यावश्‍यक कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिनाभरात रोगनिदान केंद्र 
कमला नेहरू रुग्णालय आणि कोथरूडमधील सुतार दवाखाना येथे येत्या महिन्यात दोन रोगनिदान केंद्र सुरू होतील. त्यात हृदय तपासणीपासून सर्व प्रकारच्या अत्यावश्‍यक तपासण्या माफक शुल्क आकारून करण्यात येतील. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी या तपासण्या मोफत असतील. खासगी संस्थेच्या माध्यमातून ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: pune news municipal hospital