डोणज्यात गुन्हेगाराचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

खडकवासला - डोणजे येथील केदारेश्‍वर फार्म हाउसवर जेवत असलेल्या स्वप्नील जयचंद्र देशमुख (वय 32, शाहू कॉलनी कर्वेनगर) या गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजता घडली. दरम्यान, त्याच्यासोबत असलेला मित्र लपून बसल्याने तो वाचला. 

विशाल शेळके व स्वप्नील देशमुख हे मित्र असून, ते दोघे कर्वेनगरहून आज सकाळी साडेअकरा वाजता आतकरवाडीत पोचले. तेथून सिंहगडावर पायी चालत गेले व दुपारी साडेतीनला परत आले. गाडी घेऊन ते डोणजे दुधाणे वाडीतील दुधाणे यांच्या केदारेश्‍वर फार्म हाऊसवर आले. तेथे त्यांनी जेवण व मद्याची ऑर्डर दिली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सात-आठ जण तोंडाला फडके बांधून तेथे आले अन्‌ त्यांनी स्वप्नीलवर कोयत्याने वार केले. त्याच्या शेजारी बसलेल्या विशालने हॉटेलमधील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. त्यामुळे तो वाचला. त्या वेळी हॉटेलमध्ये गोंधळ उडाला होता. त्यानंतर मारेकऱ्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली आणि डीव्हीआर पळवून नेला. 

या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्‍वंभर गोल्डे, सहायक निरीक्षक सुवर्णा हुलवान, डोणजे गावचे पोलिस पाटील अंकुश पायगुडे घटनास्थळी पोचले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पाखले, पोलिस उपअधीक्षक सुहास गरुड यांनी रविवारी रात्री घटनास्थळी भेट दिली. 

याप्रकरणी हवेली पोलिसांनी शहर पोलिस दलातील वारजे-अलंकार पोलिस ठाण्यातील मयत देशमुख याची माहिती मागविली आहे. देशमुख याच्यावर विविध प्रकारचे मारहाणीचे 14 गुन्हे दाखल असून, दोन वेळा त्याला तडीपार केले होते. 

Web Title: pune news murder