चहा पिताना धक्‍का लागल्यावरून तरुणाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे/औंध - चहा पिताना धक्का लागल्याच्या कारणावरून एकाने केलेल्या चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला; तर अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळ सिद्धीविनायक स्नॅक्‍स सेंटरसमोर सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी अमजद नदाफ (वय 30, रा. औंध) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याआधारे हल्लेखोर तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तर इम्तियाज खान (वय 22), करीम कादर सय्यद (वय 23, दोघे जण रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रस्ता, औंध) आणि अमजद नदाफ हे तिघे जण विद्यापीठ चौकाजवळ स्नॅक्‍स सेंटरसमोर नाश्‍ता आणि चहा घेत होते. त्या वेळी तेथे रिक्षामधून दोघे जण उतरले. त्या वेळी एकाचा अख्तरला धक्का लागला. त्यावर अख्तर याच्यासह तिघांनी त्या तरुणांना जाब विचारला. त्यावरून झालेल्या भांडणात रिक्षातून उतरलेल्यापैकी एकाने अख्तर आणि करीम यांच्यावर चाकूने वार केले. त्यात अख्तरच्या चेहऱ्यावर आणि डाव्या हातावर खोलवर वार झाल्यामुळे रक्तस्राव होत होता. त्यामुळे अख्तर हा जीव वाचवण्यासाठी विद्यापीठ चौकातून बाणेर रस्त्याने रक्तबंबाळ अवस्थेत पळत निघाला. तो विद्यापीठ चौकातील श्री हॉटेल ते बाणेरकडून येताना मॉडर्न विद्यालयाच्या बसथांब्यापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर गेला; परंतु मोठ्या प्रमाणावर रक्‍तस्राव झाल्यामुळे अख्तर खाली कोसळला. बेशुद्ध पडल्यानंतर त्याचा तेथे मृत्यू झाला. 

परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे पुढील तपास करत आहेत. 

Web Title: pune news murder