पत्नीचा खून; एकाला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

पुणे - चारित्र्याच्या संशयावरून लाकडी दांडक्‍याने मारहाण करून पत्नीचा खून केल्याचा प्रकार शिवदर्शन येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी दिलीप किसन डिंबळे (वय 50, रा. शिवदर्शन) याला अटक केली. त्याला शनिवारपर्यंत (ता. 7) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

याप्रकरणी अविनाश डिंबळे यांनी फिर्याद दिली असून, संगीता दिलीप डिंबळे (वय 45, रा. शिवदर्शन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी आणि त्याची पत्नी यांच्यात सतत वाद होत असे. चारित्र्याचा संशय घेत आरोपीने पत्नीच्या डोक्‍यात, तोंडावर, नाकावर लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

Web Title: pune news murder

टॅग्स