डोक्‍यात दगड घालून बसचालकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पुणे/ पौडरस्ता - सुतारदरा परिसरात एका स्कूल बसचालकाच्या डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
परशुराम बसप्पा घाटगे (वय 39, रा. शिवसाईनगर, सुतारदरा, कोथरूड) असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी मंगल घाटगे (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पौडरस्ता येथील सुतारदरा परिसरात एका व्यक्‍तीच्या डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिस सुतारदऱ्यातील घटनास्थळी पोचले. त्या वेळी मृतदेहाजवळ दोन मोबाईल, देशी दारूची बाटली, ग्लास, तंबाखूची पुडी असे साहित्य आढळले. घाटगे हे मूळ कर्नाटक राज्यातील बागलकोट येथील असून, कामानिमित्त पुण्यात आले होते. ते येथील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसवर चालक होते. त्यांचे पाच- सहा महिन्यांपूर्वी एकासोबत भांडण झाले होते. एकाचा फोन आल्यामुळे ते घरातून बाहेर गेले. ते दोघांसोबत सुतारदरा येथील मोकळ्या जागेत दारू पीत बसले होते. त्या वेळी त्यांच्या डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: pune news murder