व्यसनाधीन जावयाकडून सासऱ्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुणे - मुलीला व्यवस्थित का सांभाळत नाही, असा जाब विचारल्यावरून व्यसनाधीन जावयाने रागाच्या भरात सासऱ्याला जबर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, हडपसर पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली नाही, त्यामुळे हा प्रसंग ओढवल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

उत्तम आबाजी जाधव (वय 60, रा. गोसावी वस्ती, वैदूवाडी, हडपसर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी पार्वती जाधव (वय 50) यांनी फिर्याद दिली. त्यावरून जावई राजेंद्र दादाराव शिंदे (वय 35) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई राजेंद्र शिंदे हा मूळचा इंदापूर तालुक्‍यातील शिरसवडी येथील आहे; परंतु तोही याच भागात राहत होता. त्याचा उत्तम जाधव यांची मुलगी गीतासोबत दहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. राजेंद्रला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत भांडण होत असे. त्यामुळे गीता एक वर्षापासून माहेरी राहत होती. राजेंद्र हा अधून-मधून सासरी येऊन वाद घालत असे. गेल्या 29 डिसेंबर रोजी तो सासरघरी गेला, त्या वेळी सासरे उत्तम जाधव यांनी मुलीला व्यवस्थित का सांभाळत नाहीस, अशी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावर राजेंद्र याने लाकडी दांडक्‍याने जाधव यांच्या डोक्‍यात मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जावई राजेंद्र हा पसार झाला आहे.

आरोपीला अटक का नाही?
या घटनेसंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात मगरपट्टा व हडपसर पोलिसांमुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. पोलिस ठाण्यात गेल्यावर आम्हाला हाकलून दिले जाते. दारू पितो म्हणून ठाण्यात एक तास बसवले जाते; पण कारवाई होत नाही. राजेंद्र शिंदे याला अद्याप अटक का झाली नाही, असा प्रश्‍नही कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

Web Title: pune news murder