व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - प्रभात रस्ता येथे व्यावसायिकाचा गोळीबार करून खून केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अटक केलेल्या आरोपाला न्यायालयाने 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे. 

रवींद्र सदाशिव चोरगे (वय 41 रा. अमृतनगर, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार राहुल चंद्रकांत शिवतारे (वय 41 रा. वडगाव बुद्रुक) याचा पोलिस शोध घेत आहे. देवेन शहा या व्यावसायिकाचा 13 जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास प्रभात रस्ता येथील गल्ली क्रमांक 7 मधील सायली अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये गोळ्या घालून खून केला गेला. याप्रकरणी त्यांचा मुलगा अतित शहा यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके नियुक्त केली होती. आरोपी चोरगेला जळगाव येथे ताब्यात घेण्यात आले. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ती मंजूर केली आहे. 

Web Title: pune news murder case