पुणे: अज्ञात मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचा खून, आरोपीला अटक

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 27 जुलै 2017

याबाबत उत्तमनगरचे पोलीस निरीक्षक कल्याण विधाते यांनी सांगितले की, भिसे याचा खून केल्या प्रकरणी सतीश वामन देडगे(वय 50, नांदेड) यास बुधवारी अटक केलीे. मयत भिसे यांचा मुलगा अमर याने तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

खडकवासला (पुणे) : मुठा नदीच्या पात्रात मंगळवारी बाप लेकीचा शोध घेताना आणखी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याचे नाव संदीप खंडू भिसे(वय 40,कोंढवे- धावडे) असून त्याचा गळा आवळून खून केला आहे. खुन करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत उत्तमनगरचे पोलीस निरीक्षक कल्याण विधाते यांनी सांगितले की, भिसे याचा खून केल्या प्रकरणी सतीश वामन देडगे(वय 50, नांदेड) यास बुधवारी अटक केलीे. मयत भिसे यांचा मुलगा अमर याने तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
देडगे व मयत भिसे यांच्या पत्नीचे अनैतिक समब्ध होते. म्हनून देडगे यांनी भिसे याचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर त्याचा मृतदेह धरणालगतच्या नदी वरील पुलावरून वाहत्या पाण्यात टाकला होता. 

मयत भिसे हे धायरी ग्रामपंचायतमध्ये पाणी सोडण्याचे काम करतात. सोमवारी संध्याकाळी त्यांनी पत्नीला जेवण तयार ठेव असे फोन करून सांगितले. त्यांनतर ते रात्री घरी परतले नाही. म्हणून त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु सापडले नाहीत. सकाळी अग्निशामक दलास हा मृतदेह सापडला पोलीस तो अज्ञात असल्याने त्याचा तपास सुरू केला होता. दरम्यान संध्याकाळी त्याचे नातेवाईकणा माहीती मिळाली आणि ते पोलिस चौकीत आले. त्याने त्याला ओळखले. त्यांनतर त्याची मोटार सायकल खडकवासला धरणालगत कालव्याच्या परिसरात आढळली. शवविच्छेदन नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता.

Web Title: Pune news murder in Khadakwasla