पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पुणे - पूर्ववैमनस्यातून काही तरुणांनी मिळून एकाला बांबू आणि बिअरच्या बाटल्यांनी मारहाण केली. या घटनेत तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सदाशिव पेठेतील नागनाथपारजवळ शनिवारी रात्री घडली.

पुणे - पूर्ववैमनस्यातून काही तरुणांनी मिळून एकाला बांबू आणि बिअरच्या बाटल्यांनी मारहाण केली. या घटनेत तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सदाशिव पेठेतील नागनाथपारजवळ शनिवारी रात्री घडली.

चैतन्य काटे (वय २०, रा. शनिवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अप्पा निंबाळकर (रा. सदाशिव पेठ), चिन्या (रा. अप्पर इंदिरानगर) आणि विनोद माने (रा. दांडेकर पूल) याच्यासह अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी काटे आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. गेल्या रंगपंचमीच्या दिवशी त्यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर काटे हा मित्रासमवेत आशुतोष बेलसरे याच्याकडे शनिवारी उसने पैसे आणण्यासाठी गेला होता. त्या वेळी आरोपींनी पूर्वीच्या भांडणाच्या रागातून काटे याला जबर मारहाण केली.

दागिने लंपास
दुरुस्तीसाठी दिलेले दीड लाखाचे दागिने घेऊन पश्‍चिम बंगालचा एक कामगार पसार झाल्याची घटना गणेश पेठेत नुकतीच घडली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुनील काळे (वय ४७, रा. मार्केट यार्ड) यांनी तक्रार दिली. मकबूल हल्दर (रा. पश्‍चिम बंगाल) असे त्या कामगाराचे नाव आहे. 

वारजे येथील हॉटलेमध्ये तोडफोड
हॉटेलमधून हाकलून दिल्याच्या कारणावरून तिघांनी कोयत्याने फ्रीज आणि मीटरची तोडफोड केली. ही घटना वारजे येथील मजूर अड्डा परिसरातील जगदंबा हॉटेलमध्ये रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी वाघंबर बिरादार (वय ५०, रा. रामनगर, वारजे) यांनी तक्रार दिली. त्यावरून वारजे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोन्या वाघमारे, स्वप्नील भूमकर आणि राहुल पद्माकर ऊर्फ पाग्या अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपी हे बिरादार यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्या वेळी मित्रांमध्ये आपसांत भांडण झाले. त्यामुळे बिरादार यांनी आरोपींना हॉटेलबाहेर हाकलून लावले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी हॉटेलमधील वस्तूंची तोडफोड केली.

Web Title: pune news murderer attack