स्वरमैफलीतून उलगडले संगीतातील विविध पैलू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - वेगवेगळ्या रागांचे सौंदर्य उलगडत बनारस घराण्याचे गायक पं. राजन-साजन मिश्रा यांनी कसदार गायकीचे दर्शन घडवले आणि श्रोते त्या स्वरांच्या विश्‍वात तल्लीन होत गेले. निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे! 

संस्थेतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात राजन-साजन मिश्रा यांचे गायन रंगले. मैफलीची सुरवात त्यांनी रामदासी मल्हार या रागाने केली. विलंबित एकतालातील "सकल बलहु लाए', मध्यलय तीन तालातील "घन आये घनश्‍याम न आये' या बंदिशींनी रसिकांची मने जिंकली. हंसध्वनी रागातील "श्री गणपती गजानन' या गणेश वंदनेने रसिक भक्तिरसात न्हाऊन निघाले. "धन्य भाग सेवा का अवसर पाया...' या भजनाने मैफलीची सांगता झाली. अरविंद थत्ते (हार्मोनिअम), अरविंदकुमार आझाद (तबला), निकिता दरेकर (तानपुरा) यांनी साथ केली.

Web Title: pune news music

टॅग्स