मुस्लिम समाजातील महिलांच्या हस्ते होते गणपतीची आरती

muslim womens participate in ganesh festival
muslim womens participate in ganesh festival

मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे मुस्लिम व हिंदू महिला एकत्रितपणे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करत आहेत. मुस्लिम समाजातील महिलांच्या हस्ते येथे आरती होते. राष्ट्रीय एकत्मातेचे काम त्यांच्याकडून प्रभावीपणे राबविले जात आहे. साई श्रद्धा महिला बचत गटाच्या गणेश मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंचरच्या पूर्वेला पाच किलोमीटर अंतरावर अवसरी खुर्द गाव आहे. या गावात महिलांनी एकत्र पणे येऊन बचत गट स्थापण केला आहे. दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत ठराविक रक्कम जमा केली जाते. त्यातून गरजू महिलेला उद्योग व्यवसायाला बळकटी आणण्यासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यातून बारा सभासद महिलानी शिवन काम, खानावळ व पानपट्टीचे व्यवसाय सुरु केले आहेत. बचत गटाचे काम पाच वर्षापासून सुरु आहे. प्रत्येक मासिक बैठकित वैचारिक देवाण घेवाण केली जाते. त्यातूनच गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार पुढे आला. मुस्लिम समाजातील महिलांनी सशर्त पाठींबा दर्शविला. विशेष म्हणजे मुस्लिम समाजातील महिला उत्साहाने आरती म्हणतात.

अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील यांच्या हस्ते गणेश मंडळाच्या वतीने २५० महिलांना तुळस व जास्वंदाची रोपे भेट देण्यात आली. साई श्रद्धा महिला बचत गट गणेश मंडळाच्या अध्यक्षा कमाल ठेंबेकर, उपाध्यक्षा रेखा काळदंते, खजिनदार नजमा तांबोळी यांच्या हस्ते महिलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाच्या सदस्या रिझवान तांबोळी, आशा तांबोळी, संचिता कोकाटे, योगिता शिंदे, पूनम शिंदे, दमयंती होनराव, सुरेखा शिंदे उपस्थित होत्या. किरण वळसे पाटील म्हणाल्या, हिंदू व मुस्लीम समाज्यात खर्या अर्थाने एकोपा निर्माण करण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम सामाजिक चळवळीला प्रेरणा व प्रोत्साहन देणारा आहे. यावेळी सरपंच सुनिता कराळे, माजी सरपंच शकुंतला शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संगीता शिंदे, सुषमा शिंदे, मोनिका भालेराव उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com