म्युच्युअल फंडात पुणेकरांची गुंतवणूक ९३००० कोटी

प्रसाद पाठक
शुक्रवार, 23 मार्च 2018

पुणे - बॅंका आणि अन्य बचत योजनांच्या कमी झालेल्या व्याजदरांवर उपाय म्हणून पुणेकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. बचत व चालू खाते, मुदत ठेव, शेअर्स आणि सोन्यातील गुंतवणूक या पारंपरिक पद्धत आहे. मात्र, पुणे शहरातील गुंतवणूकदारांनी एप्रिल २०१७ ते २०१८ (फेब्रुवारीअखेर) या दरम्यान म्युच्युअल फंडात तब्बल ९२ हजार ९२२ कोटी रुपये गुंतविले आहेत. 

पुणे - बॅंका आणि अन्य बचत योजनांच्या कमी झालेल्या व्याजदरांवर उपाय म्हणून पुणेकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. बचत व चालू खाते, मुदत ठेव, शेअर्स आणि सोन्यातील गुंतवणूक या पारंपरिक पद्धत आहे. मात्र, पुणे शहरातील गुंतवणूकदारांनी एप्रिल २०१७ ते २०१८ (फेब्रुवारीअखेर) या दरम्यान म्युच्युअल फंडात तब्बल ९२ हजार ९२२ कोटी रुपये गुंतविले आहेत. 

www.amfiindia.com या संकेतस्थळावर या संबंधीची माहिती दररोज अपडेट होत आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१८ पर्यंत ९ लाख ५४ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडात झाली आहे. देशभरात डिसेंबर २०१७ अखेर सुमारे साडेसहा कोटी फोलिओ म्युच्युअल फंडामध्ये समाविष्ट झाले आहेत. पुणे शहरातील गुंतवणूक ३.६४ टक्के म्हणजे ९२ हजार कोटींच्या जवळपास आहे. 

१९६४ मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे म्युच्युअल फंड आणण्यात आले. १९६५ दरम्यान, देशभरातून म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक (ॲसेट अंडर मॅनेजमेंट अर्थात एयूएम) २५ कोटी रुपये होती. प्रत्येक वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत गेली असून, २०१८ च्या मार्चमध्ये हा आकडा २२ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. १९९५ दरम्यान खासगी कंपन्यांचा म्युच्युअल फंड बाजारात आला. 

सध्या देशातील ४२ कंपन्यांचे म्युच्युअल फंड, तर म्युच्युअल फंडांच्या पंधराशेहून अधिक विविध योजना बाजारात आहेत. त्यामध्ये इक्विटी फंड, डेट फंड, बॅलन्स फंड यांसारखे विविध प्रकारांचा समावेश आहे. अधिक चांगला परतावा मिळत असल्याने, पसंतीनुसार ग्राहक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत आहेत. अर्थात त्यामध्ये जोखीमही गृहीत धरावी लागते. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दहा लाख सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) आले आहेत. सरासरी ३१०० रुपयांच्या एसआयपी करण्यात आल्या आहेत, असे गुंतवणूकविषयक सल्लागारांनी सांगितले.

एक लाख कोटी रुपये म्हणजे : 
 २०१७-१८ या आर्थिक वर्षातील केंद्र सरकारचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 
  आयआयटी, एनआयटी आणि आयसर या संस्थांना पुढील चार वर्षांत केंद्राकडून मिळणारा निधी 
  देशातील ‘विलफुल डिफॉल्टर्स’ने बुडवलेले बॅंकांचे कर्ज 
 भारतातून होणारी वार्षिक औषध निर्यात 
 तेलंगणच्या अर्थसंकल्पापेक्षा ७४ हजार कोटी रुपये कमी

म्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढण्याची कारणे 
 बॅंकांसहित अन्य बचत योजनांच्या व्याजदरात घट 
 म्युच्युअल फंडातून मिळणारा अधिक परतावा

पारंपरिक गुंतवणुकीत मंदीची कारणे 
 बचत, चालू खाते, मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात.
 एलआयसी, भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सोन्यातील गुंतवणुकीवर मर्यादित परतावा  
 रिअल इस्टेट मार्केटमध्येही मंदी.  

कोणत्याही आजारावर डॉक्‍टरने दिलेले औषध गुणकारी ठरते. त्या प्रमाणेच कोणत्या योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक करावी, यासाठी गुंतवणूकदारांनी अर्थविषयक सल्लागाराचा सल्ला घ्यावा, जेणेकरून त्या गुंतवणूकदाराला चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल.
- अमित बिवलकर, संचालक सॅपिअंट वेल्थ ॲडव्हायझर्स अँड ब्रोकर्स प्रा. लि.

सिक्‍युरिटी एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)चे नियंत्रण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर असते. फंडातील गुंतवणुकीवर प्रोफेशनल फंड मॅनेजमेंटचा फायदा गुंतवणूकदारास मिळू शकतो. शॉर्ट टर्म व लाँग टर्म गुंतवणूकही करता येते. डेटफंड, बॅलन्स फंड, इक्विटी फंडातही गुंतवणूक फायदेशीर ठरते. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे नियमित गुंतवणुकीची सवय लागते. 
- प्रसाद देशपांडे, गुंतवणूकदार

Web Title: pune news mutual fund 93000 crore investment