लोक बदलत नाहीत हे वास्तव -नागराज मंजुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - ""जातीचा प्रश्‍न आपल्यालाच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांनाही सुटला नाही. उलट जातीचे प्रश्‍न अधिक गंभीर होत आहेत. कारण लोक बदलत नाहीत, हे समाजातील वास्तव आहे आणि ते आपण स्वीकारले पाहिजे,'' असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. जातीचा प्रश्‍न चित्रपटाने सोडवावा, अशी अपेक्षा कशाला करता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित कार्यक्रमात नागराज मंजुळे यांच्याबरोबरच आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, निखिल साने यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. तो अनुभवण्यासाठी "बालगंधर्व' श्रोत्यांच्या उपस्थितीने तुडुंब भरले होते. या वेळी परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते. 

"सोशल मीडिया'वर होत असलेल्या टीकेवर आणि कौतुकावर मंजुळे म्हणाले, ""धार्मिक वातावरण वाढविण्यासाठी आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी "सोशल मीडिया'चा वापर होत आहे. कलावंतांचे बनावट खाते तयार करून त्यावरून खोटी माहिती पसरवली जाते. त्यामुळे या माध्यमाला मी गांभीर्याने घेत नाही; पण जे गांभीर्याने लिहिणारे आहेत, त्यांनाच मी "फॉलो' करतो.'' दिग्दर्शक होण्याआधी मी भरपूर लेखन, वाचन केले आहे. वेगवेगळ्या दैनिकांत लेख प्रसिद्ध झाले आहेत; पण हल्लीची पिढी डोक्‍यावर हॅट चढवते, फोटो काढते आणि ते "फेसबुक'वर टाकते. अशाने दिग्दर्शक होता येत नाही; पण या मार्गाला अनेकजण लागले आहेत, त्यांची चिंता वाटते, अशी खंतही मंजुळे यांनी व्यक्त केली. 

शिक्षणावर तेवढेच लक्ष 
अभिनयाबरोबर माझे शिक्षणावरही तेवढेच लक्ष आहे, असे सांगून आकाश म्हणाला, ""मी सध्या पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला असून, एम.ए.ची पदवी घेत आहे.'' रिंकू म्हणाली, ""दहावीला चांगले गुण मिळाले आहेत. आता पुढे काय करायचे, यावर घरात चर्चा सुरू आहे. पुण्यातील महाविद्यालयात पुढचे शिक्षण घ्यायचे, असा विचार आहे.'' 

Web Title: pune news nagraj manjule