डॉ. प्रसाद देवधर यांना ‘नातू पुरस्कार’ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

पुणे - ‘‘नातू फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘महादेव बळवंत नातू पुरस्कार’ सिंधुदुर्ग येथील भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांना, तर लातूर येथील भटक्‍या विमुक्त समाजासाठी कार्य करणारे नरसिंग झरे यांना ‘सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर झाला आहे,’’ अशी माहिती फाउंडेशनचे विश्‍वस्त चंद्रशेखर यार्दी व दत्ता टोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कार देण्यात येतो. डॉ. देवधर यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बायोगॅस बांधून सिंधुदुर्ग हा देशातील पहिला धूरमुक्त जिल्हा करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून खेड्यातील लोकांना स्वावलंबी करण्यावर भर दिली. झरे यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्‍यात भटके विमुक्‍त गोपाळ समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे या दोघांना यंदाचा पुरस्कार दिला जाणार आहे. 

फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागात विकास करणाऱ्या संस्थाना देणगी दिली जाते. त्यात नाशिक येथील जनकल्याण सेवा संस्थास एक लाख रुपये, नंदुरबार येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी आणि श्रीगुरुजी रुग्णालयास प्रत्येकी एक लाख रुपये, उस्मानाबाद येथील ज्ञान प्रबोधिनीस ७५ हजार रुपये, हरसूल येथील आदिवासी कन्या छात्रालयास २५ हजार रुपये, पुण्यातील लक्ष्य फाउंडेशन, डॉ. रा. चिं. ढेरे सांस्कृतिक-संशोधन केंद्र, छात्र प्रबोधन, स्वातंत्रवीर सावरकर अध्ययन केंद्र आणि नार्वेकर वाचन संस्कृती मंडळ प्रत्येकी १० हजार रुपये) मदत देण्यात येणार आहे. पुरस्कारांचे वितरण मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सहा वाजता सेनापती बापट रस्ता येथील सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या हस्ते होणार असल्याचे टोळ यांनी सांगितले. या वेळी फाउंडेशनचे विश्‍वस्त विवेक गिरिधारी  उपस्थित होते.

Web Title: pune news natu foundation award Dr. Prasad Deodhar