निसर्गाचा आविष्कार कॅमेऱ्यात ‘कैद’

सुवर्णा चव्हाण
मंगळवार, 25 जुलै 2017

पुणे -  डोंगरदऱ्यातून वाहणारे धबधबे... हिरवीगार वनराई अन्‌ पावसामुळे निसर्गात निर्माण झालेले एक वेगळेच वातावरण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तरुणाईची भटकंती सुरू आहे. पावसाळ्यात ‘थीम फोटोग्राफी’साठी एक उत्तम वातावरण निर्माण झाल्यामुळे हौशी असो वा व्यावसायिक छायाचित्रकार छायाचित्रणासाठी बाहेर पडत आहेत. त्यात प्री-वेडिंग, मॉडेल शुट्‌स, थीम बेस्ड आणि वन्यजीव छायाचित्रणासाठी वाव मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हातात कॅमेरे घेतलेले छायाचित्रकार दिसत आहेत.

ताम्हिणी घाट, सिंहगड, मुळशी, पानशेत, लवासा, लोणावळा, खडकवासला यासह रायगड, रत्नागिरी, महाबळेश्‍वर, पाचगणी, माथेरान आदी ठिकाणीही छायाचित्रणासाठी छायाचित्रकारांची गर्दी होत आहे. हौशी छायाचित्रकारांमध्ये सर्वाधिक क्रेझ आहे ती निसर्ग टिपण्याची. हा ट्रेंड सध्या लोकप्रिय असून, निसर्गातील बारकावे टिपण्यासह ती छायाचित्र संकेतस्थळ, स्पर्धा आणि प्रदर्शनात देण्यासाठी तरुणाईचा कल आहे. हे सगळे फोटो फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर शेअर केले जात आहेत.

पावसाळ्यातही प्री-वेडिंग शूट
पावसाला अनुसरून वेगवेगळ्या ‘थीम’नुसार प्री-वेडिंग शूटही केले जात आहे. प्री-वेडिंग फक्त उन्हाळा किंवा हिवाळ्यात होते, असे म्हटले जाते. पण आता आउटडोअर लोकेशनला जोडपी चहा पिताना, एकाच छत्रीत रस्त्यावरून चालताना अशा रोमॅंटिक थीमनुसार हे शुट्‌स केले जात आहेत. 

पावसातही सुरक्षितपणे फोटोग्राफी 
लाखो रुपयांचा कॅमेरा पावसात भिजल्यामुळे खराब होईल, या कारणास्तव पावसाळ्यात छायाचित्रण होत नाही असे म्हटले जाते. पण कॅमेऱ्याच्या सुरक्षेसाठी वॉटरप्रूफ साहित्य उपलब्ध असल्याने कॅमेऱ्याची काळजी घेत तरुणाई छायाचित्रणासाठी घराबाहेर पडत आहे. 

पावसाळ्यात छायाचित्रण करणे तसे जिकिरीचे आहे. पण कॅमेरा आणि स्वतःच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले तर छायाचित्रण करणे अवघड गोष्ट नाही. पावसाळ्यात छायाचित्रणासाठीचा कल वाढला आहे.
प्रणव तावरे, छायाचित्रकार

Web Title: pune news nature Photography