राष्ट्रवादीचे हडपसरमध्ये कचरा प्रकल्प हटाव आंदोलन

संदीप जगदाळे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

हडपसर : राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने हडपसर - रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन हडपसर गाव वेशीसमोर आठ दिवस सुरू राहणार आहे. रविवारी घटानंद आंदोलन करून, राज्यशासन, मुख्यंत्री, महापौर, आयुक्त आणि पालकमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.

महापौर व आयुक्त, पालकमंत्री आणि मुख्यंत्र्याना गेली चार महिने लेखी, तोंडी विनंती करुन आणि आंदोलने करूनदेखील आंदोलकांचा आवाज एैकू येत नाही. त्यामुळे त्यांची कानउघडणी करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले आहे. पुढील सात दिवस सलग हे आंदोलन सुरू राहणार असून भोंगा वाजवणे, तोंडावर काळी पट्टी बांधणे, भजन, थाळी वादन, जागरण-गोंधळ, कचरा तुला, जोडो मारो आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिली.

हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे म्हणाले, हडपसर औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या नविन कचरा प्रकल्पाचे काम त्वरित थांबवावे. अन्यथा येथे रोकेम व अजिंक्य हे दोन सुरू असलेले प्रकल्प बंद पाडू. सलग 8 दिवस आंदोलन केल्यानंतरही जनतेचा तीव्र विरोधाला सत्ताधारी जुमानत नसतील तर, घनकचरा विभागाच्या गाड्या आडवणार, फोडणार आणि जाळणार. यापस्रसंगी नगरसेवक रूक्साना इनामदार, माजी नगरसेवक सुनील बनकर, सागर राजेभोसले, कलेश्र्वर घुले, दत्तात्रय झेंडे, डॉ.. शंतनू जगदाळे, प्रमोददेवकर, रविंद्र शिळीमकर, शिवाजी डोंबे, गणेश बोराटे, अतिश हिंगणे, बापू बोराटे, हेमंत कदम, विकास जाधव, जितेंद्र कद्रे, योगेश जगताप, अविनाश काळे, सतीश हिंगणे, तुकाराम ससाणे आणि वलय व राधीका सोसायटीतील पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: pune news ncp protests agitation garbage depot hadapsar