"एसटी'च्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे -  एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या गलथान कारभारच्या निषेधार्थ पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्वारगेट स्थानकात सोमवारी आंदोलन करण्यात आले. 

पुणे -  एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या गलथान कारभारच्या निषेधार्थ पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्वारगेट स्थानकात सोमवारी आंदोलन करण्यात आले. 

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. एसटी बसची अपुरी संख्या, अनियमितता, आगारांतील अस्वच्छता, चालक-वाहकांमध्ये शिस्तीचा अभाव, लोकल बस फेऱ्या रद्द केल्याने विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय इत्यादी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. याबाबत वारंवार तक्रार करूनदेखील सुधारणा न झाल्याने पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या वेळी महामंडळाच्या कारभाराविषयी सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: pune news NCP St bus supriya sule