राष्ट्रवादीने कचरा फेकून केला प्रशासनाचा निषेध

अन्वर मोमीन
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

महानगरपालिकेस सद्बुद्धी येण्याची प्रार्थना व आरती सहाय्यक उपायुक्तांच्या खुर्चीसमोर करण्यात आली.

वडगाव शेरी : पुणे महानगर पालिकेने व भाजप शासनाने खराडी प्रभाग क्रमांक चार मध्ये कचरा समस्येकडे दुर्लक्ष केल्याने प्रभागात जागोजागी शंभर टन कचरा जमला असून व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्तांच्या कार्यालयात कचरा नेऊन फेकत निषेध नोंदवला. 

स्थानिक नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ साबळे, सदाशिव गायकवाड, संदीप पठारे, अशोक बुट्टे, मयुर वाघमारे, अनिकेत झेंडे व इतर कार्यकर्ते यांनी स्वतः दोन टन कचरा भरला व स्वच्छता केली. त्यानंतर नगरसेवक पठारे यांनी सहायक उपायुक्त नगर रोड क्षेत्रिय कार्यालय येथे जाऊन कचरा पिशवी फेकली. परंतु उपायुकत वसंत पाटील उपस्तिथ नव्हते म्हणून प्रशासनाला व महानगरपालिकेस सद्बुद्धी येण्याची प्रार्थना व आरती सहाय्यक उपायुक्तांच्या मोकळ्या खुर्ची समोर करण्यात आली.

 

Web Title: pune news ncp throws garbage in pmc zonal office