राष्ट्रवादीचा 'ई कार्यकर्ता' पोहोचणार प्रत्येक मतदारापर्यंत

मिलिंद संगई
शनिवार, 8 जुलै 2017

निवडणूकीदरम्यान मतदारांची परिपूर्ण माहिती असणे प्रत्येकच राजकीय पक्षाला आवश्यक वाटते, हल्ली तंत्रज्ञानाचा विकास वेगाने झालेला असल्याने कमी कष्टात अधिक उपयुक्त माहिती एकत्र करण्याचे तंत्र विकसीत झाले आहे.

बारामती -  बदलत्या काळाची पावले ओळखून मतदारांच्या घरापर्यंत जात सर्व माहिती संकलित करण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा ई कार्यकर्ता करणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील 373 मतदान केंद्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत हा कार्यकर्ता जाऊन पोहोचणार असून इत्यंभूत माहिती गोळा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी दिली. 

निवडणूकीदरम्यान मतदारांची परिपूर्ण माहिती असणे प्रत्येकच राजकीय पक्षाला आवश्यक वाटते, हल्ली तंत्रज्ञानाचा विकास वेगाने झालेला असल्याने कमी कष्टात अधिक उपयुक्त माहिती एकत्र करण्याचे तंत्र विकसीत झाले आहे. कार्यकर्तेही हायटेक असावेत व त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर संघटना बांधणीसाठी करुन घ्यावा अशी सूचना नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. 

त्या नुसार आता पक्षाने अशा ई कार्यकर्त्यांची प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गणनिहाय तसेच शहरात प्रभागनिहाय नेमणूक केलेली आहे. या कार्यकर्त्यांकडून कुटुंबनिहाय मतदार यादीत नावे समाविष्ट आहेत की नाहीत, कुटुंबाचा व्यवसाय, त्यांची पार्श्वभूमी यासह इतरही पूरक माहिती गोळा केली जाणार आहे. निवडणूकीच्या काळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे पक्षाला अनेकदा शक्य होत नाही, मात्र आता तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रत्येक मतदाराचा मोबाईल क्रमांक गोळा करण्याचे काम सध्या पक्षाने सुरु केले आहे. 

निवडणूकीच्या काळात पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहोचविण्यापासून ते शेवटच्या क्षणी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यापर्यंतची सर्व कामे कार्यकर्ते करतात, हे काम अधिक सोपे व्हावे या साठी सोशल मिडीयाचीही मदत राष्ट्रवादी पक्ष घेणार असल्याचे होळकर व शिकीलकर यांनी सांगितले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​

Web Title: Pune news NCP workers use social media in Baramati