राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी युवकचा जवाब दो मोर्चा पिंपरी-चिंचवड महापालिकेवर...

वाल्हेकरवाडी : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप सत्तेत येऊन जवळपास ८ महिने उलटून गेली. तरीही शहरातील नागरिकांच्या सर्व पातळीवरील असणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यात आणि शहराच्या विकासा बाबतित कोणतेही सकारात्मक पाऊल न उचल्याने दिवसेंदिवस होत चाललेला शहराचा भकासपणा व शहराची होत असलेली अधोगती याबाबत सत्ताधारी भाजपाच्या विरोधात युवक राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष संग्रामदादा कोते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाचे आयोजन 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता केले आहे.

त्यामध्ये रिंगरोड बद्दलचा प्रश्न हा सध्या शहराचा आणि बाधित नागरिकांचा जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न आहे सत्ताधारी या कळीचा मुद्दाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, तसेच सर्वसामान्यांचे अनेक मूलभूत प्रश्न अधांतरी आहेत नागरिकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि  नागरिकांच्या बाजूने त्यांचे प्रश्नमांडण्याकरीता हा लढा उभारला आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप चिंचवडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गेली १५ वर्षे राष्ट्रवादी सत्तेत असताना शहरात नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधेची वानवा नव्हती.शहरात अनेक विकास कामे झाली ,युवकांना रोजगार मिळाला परंतु सध्य परिस्थितीत युवकांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा मोर्चा नोटाबंदी,जीएसटी, अनधिकृत बांधकामे, रिंगरोड, पाणी टंचाई,शास्तिकर, कचरा समस्या, बेरोजगारी इ. समस्यांना वाचा फोडण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादीच्या काळात शहर स्वच्छतेच्या बाबतीत ९ व्या क्रमांकावर होते पण या सरकारच्या काळात ते ७२ व्या स्थानावर आहे. हे शहराचा विकास करतात की भकास करतात हे नागरिकांना कळून चुकत आहे. इतके वर्षे लोक आनंदाने सण साजरे करत होते पण या सरकारच्या काळात नागरिकांचा जीव टांगणीला आहे. त्यामुळे नागरीक सुख काय हे विसरले आहेत. आम्ही जनतेत राहून, जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनता आमच्याबरोबर आहे. हा मोर्चा राष्ट्रवादी पूर्णपणे स्वबळावर उभारत असून, इतर कोणत्याही संघटनांना यामध्ये आम्ही सामील होण्यास आवाहनही केलेले नाही.

रिंगरोड बाधित नागरिक होणार मोर्चात सहभागी, फतव्याला जुमणार नाही. घर बचाव संघर्ष समितीने या मोर्चात आम्ही सहभागी होणार नाही असे समितीच्या प्रामुख्याने वक्तव्य केले होते या वर चिंचवडे म्हणाले की आम्ही या समितीला आम्हाला पाठिंबा देण्याबाबत विचारणा केली नाही त्या मुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्वबळावर या मोर्चाचे आयोजन करीत असून या मोर्चा साठी घर बचाव संघर्ष समिती ने पाठींबा दर्शविला नाही पण रिंगरोड व अनधिकृत बाधित नागरिक समितीच्या फतव्याला न जुमानता स्वाभिमानाने सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com