...आता पुढचे आयुष्य फक्त देशासाठीच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पुणे - ‘‘वयाच्या बाराव्या वर्षी मी मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेतला... लष्करात जाऊन देशाची सेवा करायचे मी लहानपणापासून ठरवले होते. त्यामुळे पुढेही मी फक्त ‘एनडीए’साठी अर्ज केला. दुसरे कुठलेही करिअर मनात नव्हते... केवळ एकच ध्यास होता, तो म्हणजे एनडीए आणि एनडीएच... आता या पुढचे माझे आयुष्य फक्त देशासाठी असणार आहे,’’ असे सांगत होता देवेंद्र कुमार.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३२ व्या तुकडीच्या पदवीदान सोहळ्यात विशेष सन्मानाने गौरविण्यात आलेल्या स्नातकांपैकी एक असणारा हरियानाचा कॅडेट देवेंद्र भारावून बोलत होता. खरे तर तिथे उपस्थित असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे तो प्रतिनिधित्व करत असल्याचे या वेळी जाणवून आले.

देवेंद्र म्हणाला, ‘‘माझे आजोबा आणि वडीलदेखील लष्करात होते. मी आजोबांनाच ही पदवी समर्पित करतोय. देशासाठी जे हवे ते करायला मी तयार असेन.’’

आकाश एआर म्हणाला, ‘‘माझे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्याचे प्रमुख श्रेय मी माझ्या ‘एनडीए’ला देईन. या संस्थेने मला जगण्याची मूल्ये शिकवली. पुढे मला फाईटर पायलट बनायचे आहे.’’

अवखळ मुलगा ते जबाबदार व्यक्ती!
आदित्य निखरा म्हणाला, ‘‘ज्या दिवसाची आम्ही सर्वजण गेली तीन वर्षं वाट पाहत आलो, तो दिवस आज आला. या तीन वर्षांत मी अंतर्बाह्य बदललोय. कितीतरी प्रकारचे साहसी खेळ मी आता खेळू शकतो. एक अवखळ मुलगा ते एक जबाबदार व्यक्ती, असे काहीसे स्थित्यंतर मी आज अनुभवतो आहे.’’

पुढे जाण्यासाठी त्यांना बळ द्या...
प्रबोधिनीचे कमांडन्ट एयर मार्शल जसजीत सिंग क्‍लेर म्हणाले, ‘‘देशाचे सार्वभौमत्व टिकवणे केवळ जवानांचे कार्य नाही. हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. पालकांनो तुमची मुले उद्या देशाची मान उंचावणार आहेत. सियाचीनच्या ग्लेशियर वर जाऊन आपल्या देशाचे रक्षण करण्याचे धैर्य आज त्यांच्या बाहूंत भरले गेले आहे. त्यांना पुढे जाण्यासाठी बळ द्या.’’

Web Title: pune news nda graduation ceremony