"नवीन रिक्षाची अट रद्द करा' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

पुणे - केंद्र सरकारने रिक्षा परवाना खुला केला; परंतु हा परवाना घेण्यासाठी नवीन रिक्षा घेणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे हा निर्णय रिक्षाचालकांसाठी अन्यायकारक ठरत असून, नवीन रिक्षाची अट रद्द करावी, अशी मागणी रिक्षा फेडरेशनने केली आहे. 

पुणे - केंद्र सरकारने रिक्षा परवाना खुला केला; परंतु हा परवाना घेण्यासाठी नवीन रिक्षा घेणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे हा निर्णय रिक्षाचालकांसाठी अन्यायकारक ठरत असून, नवीन रिक्षाची अट रद्द करावी, अशी मागणी रिक्षा फेडरेशनने केली आहे. 

सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्य परिवहन आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा परवाना मर्यादित करण्याचा निर्णय रद्द केला. यामुळे सर्व इच्छुकांना रिक्षा परवाना मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. परवाना मिळविण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) गेल्या पाच दिवसांपासून मोठी गर्दी होत आहे; मात्र नव्या अटीनुसार परवाना मिळविण्यासाठी नवीन सीएनजी किट असलेली रिक्षा खरेदी करावी लागणार आहे. यामुळे सीएनजी किट असलेली रिक्षा असूनही निष्कारण नवीन रिक्षा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे रिक्षा कंपनी आणि डिलर्सकडूनही अडवणूक होण्याची शक्‍यता आहे. याबाबी विचारात घेऊन नवीन रिक्षाची अट रद्द करावी, अशी मागणी रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बाप्पू भावे यांनी केली आहे. 

वेबसाइटच बंद 

रिक्षा परवाना आणि अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने याचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र त्यासाठी विकसित केलेली rtopune.in ही वेबसाइटच बंद असल्याचा अनुभव रिक्षाचालकांना येत आहे. तातडीने ती सुरळीत करावी, अशी मागणी रिक्षाचालकांकडून होत आहे. 

Web Title: pune news new autorickshaw