‘न्यू इयर धमाका एक्‍स्पो’ उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पुणे - नव्या वर्षाची मनसोक्त खरेदी करण्याची अनोखी संधी शुक्रवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या ‘न्यू इयर धमाका एक्‍स्पो’ या प्रदर्शनातून मिळणार आहे. ‘मधुरांगण’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात लाइफस्टाइल, ब्युटी, हेल्थकेअर, किचनवेअर, कन्झ्युमर प्रॉडक्‍ट आणि फूड अशा विविध क्षेत्रातील नवी उत्पादने पाहायला मिळतीलच; पण त्याचबरोबर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्पर्धांमध्ये भाग घेऊन हजारोंची बक्षिसे जिंकता येणार आहेत. हे प्रदर्शन घरकुल लॉन्स, डी. पी. रस्ता, म्हात्रे पूल येथे रविवार (ता. २१) पर्यंत दु. १२ ते ८ या वेळेत विनामूल्य असेल.

पुणे - नव्या वर्षाची मनसोक्त खरेदी करण्याची अनोखी संधी शुक्रवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या ‘न्यू इयर धमाका एक्‍स्पो’ या प्रदर्शनातून मिळणार आहे. ‘मधुरांगण’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात लाइफस्टाइल, ब्युटी, हेल्थकेअर, किचनवेअर, कन्झ्युमर प्रॉडक्‍ट आणि फूड अशा विविध क्षेत्रातील नवी उत्पादने पाहायला मिळतीलच; पण त्याचबरोबर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्पर्धांमध्ये भाग घेऊन हजारोंची बक्षिसे जिंकता येणार आहेत. हे प्रदर्शन घरकुल लॉन्स, डी. पी. रस्ता, म्हात्रे पूल येथे रविवार (ता. २१) पर्यंत दु. १२ ते ८ या वेळेत विनामूल्य असेल. खास आकर्षण म्हणून लकी ड्रॉ विजेती/विजेत्याला ३५००० रुपये किमतीची पैठणी मिळणार आहे. स्थळ प्रायोजक हॉटेल श्रेयस व घरकुल लॉन्स, बक्षीस व लकी ड्रॉ प्रायोजक सौदामिनी हॅंडलूम हे आहेत.

या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून ‘प्रभावी अभ्यासाची गुरुकिल्ली’ ही कार्यशाळा शुक्रवारी (ता. १९) सायं. ५ वाजता होणार आहे. दवे ॲकॅडमीचे संचालक भूपेश दवे मार्गदर्शन करणार असून, सहावी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी उपयुक्त असलेली ही कार्यशाळा विनामूल्य आहे. परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातील स्ट्रेस मॅनेजमेंट, मेमरी टेक्‍निक, टाइम मॅनेजमेंट आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग यासोबतच विद्यार्थ्यांना हमखास यश मिळवून देणाऱ्या माईंड पॉवरबद्दलही या वेळी मार्गदर्शन होणार आहे. आत्मविश्‍वास आणि एकाग्रता वाढविणाऱ्या या कार्यशाळेत परीक्षा सराव व उजळणीसाठी रुट चार्ट, भाषा व विज्ञान विषयांसाठी स्पेल्स सॅंट, मोठी उत्तरे लक्षात राहण्यासाठी चॅनेल्स स्मरणशक्ती, प्रभावी वाचन, एकाग्रता व नियोजनाचे तंत्र या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

शनिवारी (ता. २०) दुपारी २ वाजता ‘सूप टू डेझर्ट रेसिपी शो’चं आयोजन करण्यात आले असून, त्यात विविध पदार्थांच्या २५ रेसिपी करून दाखविण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी रविवारी (दि. २१) दुपारी १ वाजता ‘पैठणी क्वीन’ स्पर्धा हे महिलांसाठी विशेष आकर्षण असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्र. २१०००, द्वितीय १७०००, तृतीय १०००० अशी बक्षिसे देण्यात येतील. मधुरांगण सभासदांसाठी स्पर्धा विनामूल्य असून, सदस्येतर महिलांसाठी रु. १५००/- नोंदणी शुल्क भरून या स्पर्धेत सहभागी होता येईल. या वेळी ‘सौदामिनी हॅन्डलूम’च्या संचालिका अनघा घैसास या पैठणीचा आजवरचा प्रवास उलगडून सांगणार आहेत. तसेच खरी पैठणी कशी ओळखायची, ती बनते कशी हे प्रात्यक्षिकासह दाखविण्यात येणार आहे. हातमागावर प्रत्यक्ष पैठणी विणण्याचा अनुभव या वेळी उपस्थितांना घेता येणार आहे. अल्पावधीतच वाचक व वैद्यकीय तज्ज्ञांच्या पसंतीस उतरलेल्या ‘उदरस्थ’ पुस्तकाच्या लेखिका वैद्य रूपाली पानसे रविवारी (ता. २१) सायं. ५ वा. संवाद साधणार आहेत. ही संधी उपलब्ध करून दिली आहे, ती ‘सकाळ मधुरांगण’ व ‘रसिक साहित्य’ यांनी आयोजित केलेल्या ‘नैवेद्य ते चिअर्स!’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमानं.

आरजे स्मिता या वाचकांच्या प्रतिनिधी म्हणून लेखिकेशी संवाद साधणार आहेत. आहाराबाबतचे नवनवीन प्रश्‍न, काही समज-गैरसमज, पूर्वापार चालत आलेल्या आहारविषयक सवयी, जागतिकीकरण, चौरस आहाराचे बदलते स्वरूप, बदलती जीवनशैली यावर मार्गदर्शन होईल. तसेच ‘टू मिनिट्‌स’ फेम पदार्थांना पर्यायी सकस आणि चविष्ट पदार्थांच्या पाककृतीही शिकवणार आहेत. ‘उदरस्थ’ पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असून, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मधुरांगणच्या जुन्या सदस्यांना ते सवलतीत रु. १६० ला मिळणार आहे. मधुरांगणच्या नवीन सदस्यांना ‘उदरस्थ’ हे पुस्तक व रसिक आंतरभारतीचे ‘साहित्य सूची’ मासिक वर्षभर भेट मिळणार आहे. मधुरांगण सभासद नोंदणी कार्यक्रमस्थळी दु. १२ ते रात्री ८ पर्यंत करता येईल. 
अधिक माहितीसाठी संपर्क - ९०७५०१११४२ किंवा ८३७८९९४०७६.

Web Title: pune news new year dhamaka expo